या भरतीबाबत नुकतीच अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अप्रेंटीस भरती २०२३’ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…
पदाचे नाव आणि पदसंख्या:
वीजतंत्री – ४३
अप्रेंटिस तारतंत्री – १०
कोपा – ६
एकूण रिक्त पदे – ५३
(वाचा: NHM Solapur Recruitment 2023: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..)
शैक्षणिक पात्रता: १० वी पास तसेच संबंधित विषयात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत.
अर्ज शुल्क: या भारतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकरण्यात आलेले नाही.
नोकरीचे ठिकाण: भंडारा.
‘महावितरण’चे अधिकृत संकेतस्थळ: https://www.mahadiscom.in/
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३
या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठ https://drive.google.com/file/d/1ROCFsAev8-7WHylHuuzjbV9d4wk_UuFV/view या लिंकवर क्लिक करावे.
विशेष सूचना:
- ही भरती केवळ भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असल्याने अर्ज करणार्या उमेदवारांकडे भंडारा जिल्ह्यातीलअधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- त्याशिवाय अर्ज पात्र ठरणार नाही. तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजेच ३० सप्टेंबर नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- या भरती करिता राजकीय किंवा कोणताही अधिकारी वर्गाकडून दबाव आणल्यास संबंधित अर्ज बाद केला जाईल.
(वाचा: Educational News: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी १७ नंबर फॉर्म भरणार्या विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ..)