Infinix Note 30 VIP Racing Edition ची किंमत
कंपनीनं नोट ३० विआयपी रेसिंग एडिशनमध्ये १२जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ह्याची किंमत २९९ अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे २५,६०० रुपये आहे. विक्रीची तारीख मात्र समजली नाही. हा फोन नायजेरिया, इराक, केनिया आणि फिलिपींसमध्ये उपलब्ध होईल. परंतु भारतीय लाँचची माहिती मिळाली नाही.
वाचा: लाँच होताच iPhone 15 सीरीजवर ६००० रुपयांचा डिस्काउंट; अशी आहे प्री बुकिंग ऑफर
Infinix Note 30 VIP Racing Edition ची डिजाइन
इंफिनिक्स नोट ३० विआयपी रेसिंग एडिशनच्या बॅक पॅनलवर रेसिंग डॅशबोर्डसारखी डिजाईन देण्यात आली आहे. होतील तीन रंगाची लाइटिंग स्पीड, पावर आणि परफॉर्मन्सचं प्रतीक आहे. वरचा बाजूला असलेल्या कॅमेरा माड्यूलमध्ये दोन मोठे आणि दोन छोटे वर्तुळाकार कटआउट आहेत. ज्यात तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश मिळतो.
Infinix Note 30 VIP Racing Edition चे स्पेसिफिकेशन्स
ह्या फोनचे फीचर्स Infinix Note 30 VIP सारखेच आहेत परंतु ह्याला खास बनवण्यासाठी कंपनीनं रिटेल पॅकेजला बीएमडब्ल्यू थीम दिली आहे. ह्या थीमसह युजर्सना १५ वॉटचा वायरलेस चार्जर, इयरबड्स आणि एक विआयपी कार्ड मिळेल.
मोबाइलमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो ९०० निट्झ पीक ब्राइटनेस, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पंच होल डिजाइन मिळते. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी ६८वॉट फास्ट चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्टसह देण्यात आला आहे.
फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसीटी ८०२० चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर माली जी-७७ जीपीयू मिळतो. त्याचबरोबर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन ९जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे एकूण १९ जीबी रॅमची ताकद मिळते.
वाचा: Redmi नं भारतात लाँच केला Smart Fire TV 4K; जाणून घ्या किंमत
फोटोग्राफीसाठी Note 30 VIP Racing Edition मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.