ही भरती गोकुळ या लोकप्रिय दूध उत्पादक कंपनीकरिता असून या अंतर्गत ‘विपणन क्षेत्र पर्यवेक्षक’ पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांना पुढच्या काही दिवसातच अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे करायचा असून १९ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासंदर्भात सविस्तर तपशील पुढील प्रमाणे…
पदाचे नाव आणि पदसंख्या:
विपणन क्षेत्र पर्यवेक्षक –
मुंबई – ठाणे – २५
पुणे – ५
एकूण पदसंख्या – ३० जागा
शैक्षणिक पात्रता: एमबीए शिक्षण प्राप्त केलेल्या उमेवारांना प्राधान्य दिले जाईल. किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात उत्तीर्ण विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
(वाचा: NHM Solapur Recruitment 2023: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..)
महत्वाचे निकष:
दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव
दहावी आणि बारावी मध्ये गणित विषयात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
स्वतःचे दुचाकी वाहन लायसन्स सहित असणे आवश्यक आहे.
महिलांना या भरतीत विशेष प्राधान्य राहील.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: hrdmgr@gokulmilk.coop
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ सप्टेंबर २०२३
गोकुळ दूध संघाची अधिकृत वेबसाईट: https://www.gokulmilk.coop/
अर्ज कसा करावा: अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज विहित वेळेच्या आधी दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
भरतीची जाहिरात वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1engTmdCzOmIXOxDwX1jvpo-TRkBgJYzh/view या लिंकवर क्लिक करावे.
(वाचा: Educational News: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी १७ नंबर फॉर्म भरणार्या विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ..)