Samsung देणार आयफोनपेक्षा जास्त चार्जिंग स्पीड; Galaxy S24, S24 Plus आणि S24 Ultra ची माहिती लीक

सॅमसंग २०२४ च्या सुरुवातीला आपली Galaxy S24 सीरीज लाँच करू शकते. ह्यात Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोन सादर केले जाऊ शकते. आता हे तिन्ही डिवाइस सर्टिफिकेशन वेबसाइट ३सी वर दिसले आहेत. ज्यातील फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली आहे.

Samsung Galaxy S24 सीरीज 3C लिस्टिंग

सर्टिफिकेशन वेबसाइटवर Samsung Galaxy S24 फोन SM-S9210 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ह्यात २५वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. Galaxy S24 Plus ह्या वेबसाइटवर SM-S9260 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. तर Samsung Galaxy S24 Ultra मॉडेल SM-S9280 सह लिस्ट झाला आहे. प्लस आणि अल्ट्रा डिवाइसमध्ये ४५वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. तसेच तिन्ही फोन ५जी कनेक्टिव्हिटीसह सादर केले जातील.

वाचा: एकाच वेळी लाखो लोकांना पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; असं बनवा तुमचं स्वतःचं WhatsApp Channel

सॅमसंग गॅलेक्सी एस२४ सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी एस२४ सीरीजचा प्लस आणि अल्ट्रा मॉडेल ६.६५ इंच अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशनला सपोर्ट करू शकतो. कंपनी ह्यावेळी टायटेनियम चेचिसचा वापर करू शकते.

गॅलेक्सी एस२४ सीरीजच्या अल्ट्रा मॉडेलमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट दिला जाऊ शकतो, तर दोन अन्य मॉडेल एक्सॉनॉस २४०० प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. हे फोन्स अँड्रॉइड १४ आधारित वनयूआय ६ वर चालू शकतात.

वाचा: चमकणाऱ्या लाइट्स आणि १०८ मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा; Infinix Note 30 VIP Racing Edition ची दणक्यात एंट्री

एस२४ अल्ट्रा मध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, ५० मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि १० मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स आहे. एस२४ अल्ट्रा मध्ये ५१००एमएएचची बॅटरी मिळू शकते. तर एस२४ प्लस आणि एस२४ मध्ये ५०००एमएचची किंवा ४९००एमएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

Source link

samsungsamsung galaxy s24samsung galaxy s24 plussamsung galaxy s24 seriessamsung galaxy s24 series launchsamsung galaxy s24 ultra
Comments (0)
Add Comment