या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून २९ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेला केवळ सायंकाळी ६ वाजेपर्यंतच तुम्ही अर्ज करू शकता. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या या भरती साठीची पात्रता, वेतन आणि सविस्तर माहिती जाणून पुढीलप्रमाणे…
पदे आणि पदसंख्या:
वित्त आणि लेखा (फायनान्स आणि अकांउट्स) – १९ जागा
मानव संसाधन(ह्युमन रिसोर्स) – २ जागा
व्यवसाय विकास (बिझनेस डेव्हलपमेंट) – २१ जागा
तंत्रज्ञान (टेक्नलॉजी) – ५ जागा
कायदा आणि पुनर्प्राप्ती( लॉ आणि रिकव्हरी) – २ जागा
कंपनी सचिव (कंपनी सेक्रेटरी) – १ जागा
राजभाषा – १ जागा
एकूण जागा : ५१
(वाचा: Goa Shipyard Recruitment 2023: ‘गोवा शिपयार्ड’ मध्ये विविध पदांची भरती! जाणून घ्या पदे, पात्रता आणि अर्ज कसा करावा..)
वेतन श्रेणी: वेतन पदांनुसार असून अनादाजे ३० हजार ते १ लाख २० हजार रुपये इतके आहे.
वयोमर्यादा: २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादा २८ वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत आहे.
अर्ज शुल्क: अर्ज शुल्क १५०० रुपये आहे. तर एससी, एसटी, पीडब्युडी, महिला उमेदावार आणि विभागातील उमेदावरासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. हे अर्जशुल्क एनईएफटी द्वारे भरायचे आहे.
‘एनएसआयसी’ चे अधिकृत संकेतस्थळ: https://www.nsic.co.in/
या पदांसाठी थेट अर्ज करण्यासाठी लिंक: https://nsic.co.in/recruitment/
या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://www.nsic.co.in/PDFs/Careers/2023830144715.pdf या लिंकवर क्लिक करा..
या भरतीसाठी अर्ज कसा करावा: या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी nsic.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. येथील मुख्य स्क्रीनवरील करिअर टॅबवर क्लिक करा. तिथे ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय असेल तिथे जाऊन आपली नांदणी करा. नोंदणी झाल्या नंतर स्वतची सर्व माहिती भरून अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करा.
(वाचून: NHM Solapur Recruitment 2023: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..)