पर्यावरण या विषयात सध्या इतके काम सुरू आहे की, या क्षेत्राच्या कक्षा प्रचंड रुंदावल्या आहेत, त्यामुळे करियरच्या संधीही अनेक उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रातील नोकरीच्या संधी, संशोधन शाखा झपाट्याने विस्तारत आहेत. पर्यावरण क्षेत्रात विविध प्रयोग केले जात आहेत. म्हणूनच आज पर्यावरण विज्ञान या क्षेत्राकडे वळणे हे गरजेचे आहे.
पर्यावरण विज्ञान ही विद्याशाखा जीवसृष्टी आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित असून भवतालच्या पर्यावरणीय घटकांचा सूक्ष्म अभ्यास इथे केला जातो. मानवी अतिरेकाला आळा घालण्याचे आणि त्याचे परिणाम सांगण्याचे काम हे संशोधक करतात. याशिवाय सध्याच्या वातावरणात पर्यावरणाची स्थिती, परिणाम, त्यात काय बदल असायला हवे, कोणत्या गोष्टी थांबायला हव्यात याचे देखील आकलन याच विद्याशाखेमुळे होते. तेव्हा जाणून घेऊया पर्यावरण विज्ञान या विषयातील करियरच्या संधी…
(वाचा: NHM Solapur Recruitment 2023: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..)
पहिली पायरी..
पर्यावरण विज्ञान या विषयात करियर करायचे असेल तर विज्ञान आणि पर्यावरण या दोहींची आवड हवी. हे क्षेत्र संशोधनावर आधारित असल्याने संयम असायला हवा. शिवाय चिकित्सक वृत्ती असायला हवी. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याला अभ्यासणे या क्षेत्राचे मूळ आहे. त्यामुळे हा विषय निवडताना या पहिल्या पायरीची तयारी हवी.
विद्याशाखेविषयी..
पर्यावरण विज्ञान या विषयात तज्ज्ञता मिळवण्यासाठी बीएस्सी आणि एमएस्सी असणे गरजेचे आहे. अनेक विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याच्या कक्षा इतक्या मोठ्या आहेत जैविक विज्ञान, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगोल या सगळ्या विषयांचा आढावा घेता यतो. पर्यावरण वैज्ञानिकांची आज मोठी गरज निर्माण झाली आहे.
कामाच्या संधी..
पर्यावरण या विद्याशाखेतून करियर केल्यास आता नोकरीच्या अनेकी संधी उपलब्ध आहेत. पाणी आणि माती वैज्ञानिक म्हणूनही काम करू शकता. उद्योग, खते, खाण, रिफायनरी, वस्त्रोद्योग, सामाजिक विकास, संशोधन आणि विकास, वन्यजीव व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागरी योजना, जलसंपदा आणि कृषी, खासगी उद्योग, वन आणि पर्यावरण मंत्रालय, हवामान बदल संबंधित सरकारी संघटना पॅनेल (आयपीसीसी), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी), भू-प्रणाली शासन प्रकल्प, दूतावास आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक शासकीय नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच संशोधक म्हणूनही तुम्ही काम करू शकता. याशिवाय स्वतःची संस्था सुरू करू शकता किंवा पर्यावरणावर काम करणार्या अन्य संस्थामध्येही अनेक संधी आहेत.
(वाचा: Goa Shipyard Recruitment 2023: ‘गोवा शिपयार्ड’ मध्ये विविध पदांची भरती! जाणून घ्या पदे, पात्रता आणि अर्ज कसा करावा..)