मेडिकल अभ्यासक्रमांसाठी NExT पर्याय; ही आहेत परीक्षेची मार्गदर्शक तत्त्वे

NMC Guidelines: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार केवळ एमबीबीएसचे विद्यार्थीच पुरवणी परीक्षेला बसू शकतील. ज्या उमेदवारांची थिअरीमध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती आणि प्रॅक्टिकलमध्ये ८० टक्के उपस्थिती आहे असे वियार्थी या परीक्षेला बसू शकणार आहेत. त्यामुळे, साहजिकच थिअरीमध्ये ७५ टक्क्यांहून कमी आणि प्रॅक्टिकलमध्ये ८० टक्क्यांहून कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षेत ग्रेस गुण नसल्याची माहितीही NMC ने दिली. त्याचबरोबर, यंदा एमबीबीएसला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावे दत्तक घ्यावी लागणार आहेत. गाव दत्तक घेण्याचे नियम हे १ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या National Medical Commission (NMC) च्या सक्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण (CBME) नियम २०२३ मधील महत्त्वाचा भाग आहेत.

(वाचा : NExT Entrance Updates: पुढील आदेशापर्यंत नेक्स्टला स्थगिती, आरोग्य मंत्रालयाची मोठी घोषणा)

NMC च्यावतीने नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे जे विद्यार्थी उपस्थितीच्या टक्केवारीची अट पूर्ण करू शकणार नसतील किंवा ही अट पूर्ण करण्यास असक्षम ठरतील अशा विद्यार्थ्यांना एनएमसीने आणखी एक संधी देण्याचे ठरवले आहे. त्यांना त्यांच्या उपस्थितीची कमतरता भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात कनिष्ठ उपस्थिती टक्केवारी भरून पुढील परीक्षेसाठी उपस्थित राहता येणार आहे.

एनएमसीच्यावतीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यावर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन एमबीबीएस बॅचला फेब्रुवारी २०२८ मध्ये राष्ट्रीय एक्झिट टेस्ट (NExT) फेज १ ला उपस्थित राहावे लागेल. जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार, पुढचा टप्पा २ फेब्रुवारी २०२९ मध्ये आयोजित केला जाणार आहे.

NExT म्हणजे काय?

नॅशनल मेडिकल कमिशन नेक्स्ट लागू करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा भारतात मेडिकल अभ्यासाचा सराव करण्यासाठी NEET PG ची जागा ही परीक्षा घेईल. या स्कोअरच्या आधारे विविध पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात सराव करण्यासाठीही NexT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

(वाचा : ही आहेत देशातील टॉप १० मेडिकल कॉलेजेस; येथे प्रवेश घेणे हे प्रत्येक NEET UG-PG पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न)

Source link

medical education departmentnational medical commissionNEET PGNExT Entrance Exam Updatesnmcnmc guidelines for mbbs
Comments (0)
Add Comment