मिळालेल्या माहितीनुसार, विज्ञान शाखेमधून (Science Branch) मधून बारावी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार आणि व्यावसायिक या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यास पात्र आहेत. सदर अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची पद्धत आणि या प्रक्रियेची संपूर्ण माहिती आयआयटी गुवाहाटीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. संस्थेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिलेल्या उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर, JEE Advanced परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
(वाचा : IIT Zanzibar campus Admission: आयआयटी मद्रासच्या झांझिबार कँपसमध्ये प्रवेशांना सुरुवात; ऑनलाइन अर्ज उपलब्ध)
IIT Guwahati मधील हे अभ्यासक्रम फाऊंडेशनल सर्टिफिकेट (प्रथम वर्ष), डिप्लोमा (द्वितीय वर्ष), बॅचलर डिग्री (तिसरे वर्ष), किंवा ऑनर्स डिग्री (चौथे वर्ष) यासह अनेक एक्झिट सिस्टमवर (Exit System) आधारित असेल. शिवाय, उमेदवार एक वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा या कोर्सेसमध्ये सामील होऊ शकतात आणि पदवी पूर्ण करू शकतात.
आयआयटीच्या म्हणण्यानुसार, सदर कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एआय इंजिनिअर (AI Engineer), एमएल इंजिनिअर (ML Engineer), एआय रिसर्च सायंटिस्ट (AI Research Scientist), बिग डेटा इंजिनीअर (Big Data Engineer), डेटा अॅनालिस्ट (Data Analyst) आणि बिझनेस इंटेलिजन्स अॅनालिस्ट (Business Intelligence Analyst)अशा विविध उद्योगांमध्ये विविध भूमिकांसाठी तयार केले जाईल. याशिवाय, येथून कोर्स करणाऱ्या उमेदवारांना येथील माजी विद्यार्थ्यांचीही मदत मिळणार आहे. यामुळे त्यांना करिअरच्या अनेक संधीही उपलब्ध होणार आहेत.
(वाचा : IIT Admission: परदेशातील पहिला आयआयटी कॅम्पस; शिक्षण मंत्रालयाकडून झाला रीतसर करार)
हा अभ्यासक्रम शिकणारे पदवीधर विद्यार्थी आयआयटी गुवाहाटी येथे पदव्युत्तर किंवा पीएचडी पदवीसाठी अर्ज करण्यासही पात्र ठरतील. “टेक्नॉलॉजी, बिग डेटा आणि सॉफ्टवेअरमधील जलद प्रगतीमुळे डेटा सायन्स उद्योग वाढत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२३ (World Economic Forum Future of Jobs Report 2023) नुसार, AI आणि मशीन लर्निंग तज्ञ, डेटा विश्लेषक आणि डेटा वैज्ञानिकांसह तांत्रिक भूमिका २०२८ पर्यंत ३० टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे.
(वाचा : IIT Admission: आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)