Reliance Industries चे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, Mukesh Ambani ह्यांनी यंदा अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये घोषणा केली होती की Jio AirFiber गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केली जाईल. Jio AirFiber मध्ये पॉईंट-टू-पॉईंट रेडियो लिंक्सचा वापर करून वायरलेस पद्धतीनं इंटरनेट उपलब्ध केलं जाईल. Jio AirFiber मध्ये हाय-स्पीड इंटरनेट देण्यासाठी ५जी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. कंपनीच्या Jio Fiber इंटरनेट सर्व्हिसमध्ये नेटवर्क कव्हरेजसाठी वायर्ड फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर केला जातो. तसेच ह्यात पॅरेंटल कंट्रोल, Wi-Fi 6 सपोर्ट आणि इंटीग्रेटेड सिक्योरिटी फायरवॉल सारखे फीचर्स असतील.
हे देखील वाचा: Airtel आणि Jio देणार ग्राहकांना पैसे; ट्रायच्या आदेशामुळे अडचणी वाढल्या
Jio Fiber मध्ये १ जीबीपीएस पर्यंतच्या स्पीड मिळतो, तर Jio AirFiber मध्ये हा स्पीड १.५ जीबीपीएसवर जाईल. अलीकडेच रिलायन्स जियोनं घोषणा केली होती की कंपनीनं गेल्यावर्षी मिळवल्या स्पेक्ट्रमसाठी सर्व स्पेक्ट्रम बँड्समध्ये निर्धारित कालावधीपूर्वीच लाँच पूर्ण केला आहे. याआधी कंपनीनं गेल्या महिन्यात टेलीकॉम डिपार्टमेंट (DoT) कडे लाँच पूर्ण केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर DoT नं ११ ऑगस्ट पर्यंत सर्व सर्कलमध्ये ह्यासाठी आवश्यक टेस्टिंग पूर्ण केलं होतं.
हे देखील वाचा: Motorola नं केलं शक्तिप्रदर्शन! ६०००एमएएचच्या बॅटरीसह Moto G54 Power लाँच, नवा Moto G54 देखील आला
रिलायन्स जियोनं पाच कोटींपेक्षा जास्त कस्टमर्ससह ५जी सर्व्हिस मध्ये पाहिलं स्थान मिळवलं आहे. कंपनीच्या नेटवर्कवर प्रति युजर डेटा २५ जीबी दरमहा पेक्षा जास्त वापरत आहेत. गेल्या महिन्यात कंपनीनं तीन नवीन कमी किंमतीचे प्रीपेड इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन देखील लाँच केले होते.