Tecno India च्या अधिकृत एक्स हँडलवर नवीन फ्लिप फोनचा लाँच टीज करण्यात आला आहे. तसेच Amazon India वर देखील Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोनसाठी खास मायक्रोसाइट लाइव्ह करण्यात आली आहे. ही साइट लाइव्ह झाल्यामुळे हा फोन भारतात लवकरच येईल, हे स्पष्ट झालं आहे. अॅमेझॉनवर रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये हा फोन पर्पल कलर व्हेरिएंटमध्ये दिसत आहे.
हे देखील वाचा: ४जी फोनला देखील मिळणार १.५ जीबीपीएसचा स्पीड; उद्या लाँच होणार Jio AirFiber
कंपनी कमी किंमतीत बाजारात स्टायलिश फ्लिप ऑप्शन सादर करण्याची तयारी करत आहे. हा फोन लाँच झाल्यामुळे Samsung, Oppo व Motorola च्या फ्लिप स्मार्टफोनला चांगली टक्कर मिळू शकते. अॅमेझॉनवर सध्या टेक्नो फँटम वी फ्लिप ५जी फोन Coming soon टॅग सह लिस्ट करण्यात आला आहे. परंतु लाँच डेट मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. ह्याच्या फीचर्स संबंधित माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा: Airtel आणि Jio देणार ग्राहकांना पैसे; ट्रायच्या आदेशामुळे अडचणी वाढल्या
Tecno Phantom V Flip चे लीक स्पेसिफिकेशन्स
टेक्नो फ्लिप फोनच्या फीचर्सची माहिती लीकमधून समोर आली आहे. लीक्सनुसार, फोनमध्ये ६.७५ इंचाचा फ्लिप डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्झ असेल. ह्याच्या बॅक पॅनलवर १.३२ इंचाचा कलर डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी ४०००एमएएचची असू शकते. ज्यात ६६ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.