WhatsApp Group Calling: व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगमध्ये मोठा बदल; एका क्लिकमध्ये संपूर्ण ग्रुपला करा कॉल

व्हॉट्सअ‍ॅपनं अलीकडेच एक नवीन फीचर सादर केलं आहे. त्यामुळे ग्रुप कॉलिंगमध्ये मोठा बदल होईल आणि मजा देखील द्विगुणित होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅपनं एक नवीन सुविधा सुरु केली आहे त्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त ३१ लोकांना कॉल करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगमध्ये होणाऱ्या ह्या सर्वात मोठ्या बदलाची माहिती WABteaInfo नं दिली आहे. ही वेबसाइट जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर बारकाई लक्ष ठेऊन असते. त्यांच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप कॉल टॅबमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी ३१ युजर्सना कॉल करण्याची सुविधा मिळेल. ह्यासाठी अँड्रॉइड बीटा अपडेट रिलीज करण्यात आला आहे. हा अपडेट व्हर्जन २.२३.१९.१६ मध्ये अ‍ॅक्सेस करता येईल.

हे देखील वाचा: १२ हजारांत १२जीबी रॅम! ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह स्वस्त Vivo Y17s लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशी वाढत गेली युजर्सची संख्या

याआधी WhatsApp युजर्स एकावेळी जास्तीत जास्त १५ लोकांना ग्रुप कॉल करू शकत होते. त्याआधी ही मर्यादा फक्त ७ युजर्सची होती. परंतु आता ही मर्यादा वाढवून ३१ करण्यात आली आहे. त्यामुळे मित्रांच्या एक मोठ्या ग्रुपला देखील एकत्र ऑनलाइन व्हिडीओ कॉल करता येईल. तसेच स्क्रीन शेयरिंग सारख्या फिचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगच्या मदतीनं आता ऑफिशियल मिटिंग देखील घेता येतील. बदल पाहता, व्हॉट्सअ‍ॅपनं फ्लोटिंग अ‍ॅक्शन बटनच्या जागी प्लस आयकॉन दिला आहे.

हे देखील वाचा: iOS 17 Update: आजपासून बदलणार तुमचा iPhone, नव्या फीचर्ससाठी अपडेट करा मोबाइल

व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल फिचर भारतात उपलब्ध

व्हॉट्सअ‍ॅपनं अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल फीचर लाइव्ह केलं आहे. त्यामुळे कोणीही आपलं चॅनेल बनवू शकेल. हा एक ब्रॉडकॉस्टिंग चॅनेल आहे, ज्यात तुमचे अपडेट हजारो युजर्सना सहज पाठवता येतील. एकतर्फी मेसेज पाठवण्यासाठी हे फिचर आलं आहे, ज्यावर रिसिव्हर फक्त रिअ‍ॅक्ट करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपनं १५० पेक्षा जास्त देशांमध्ये चॅनेल फीचर लाइव्ह केलं आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर बॉलिवुड अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्स्ट्रेस सोबतच बीसीसीआय सारख्या स्पोर्ट्स टीमचे चॅनेल आहेत.

Source link

group video calling limitWhatsAppwhatsapp group callingwhatsapp video group calling limitव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व्हिडीओ कॉलिंग
Comments (0)
Add Comment