३४ हजारांमध्ये आयफोन! परवडणाऱ्या iPhone SE 3 ची किंमत आणखी कमी, पाहा ऑफर

४० हजारांच्या आत आयफोन विकत घ्यायचा आहे का? तुम्हाला हे शक्य वाटणार नाही परंतु Flipkart मुळे इतक्या कमी किंमतीत आयफोन घेणं देखील शक्य झालं आहे. ऑफर अंतर्गत ग्राहक iPhone SE 3 मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. त्याचबरोबर एक्सचेंज आणि बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे. परंतु iPhone SE 3 विकत घ्यावा का?

iPhone SE वरील डिस्काउंट

iPhone SE 3 चा ६४जीबी व्हेरिएंट नेहमी फ्लिपकार्टवरून ४९,९९० रुपयांमध्ये विकला जातो. परंतु आता ३१ टक्के म्हणजे १५,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा डिवाइस फक्त ३३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट आणखी डिस्काउंट देखील देत आहे त्यामुळे ह्या आयफोनची किंमत आणखी कमी होईल. जसे की तुम्ही वनकार्ड क्रेडिट कार्डवरून ईएमआय ट्रँजॅक्शन केल्यास तुम्हाला १००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे.

हे देखील वाचा: WhatsApp Group Calling: व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगमध्ये मोठा बदल; एका क्लिकमध्ये संपूर्ण ग्रुपला करा कॉल

ह्या आयफोनवर एक्सचेंज आणि बँक ऑफर देखील फ्लिपकार्ट देत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ३०,६०० रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल. त्यामुळे जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तो देऊन तुम्ही हा डिस्काउंट मिळवू शकता. ही सूट तुमच्या फोनच्या मॉडेलवर अवलंबून असेल.

ह्या ऑफर्स iPhone SE 3 च्या इतर कलर आणि स्टोरेज मॉडेल्सवर देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला फक्त आयफोन हवा असेल आणि तुमचा वापर जास्त नसेल तर तुम्ही iPhone SE 3 वरील मोठ्या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता.

हे देखील वाचा: iOS 17 Update: आजपासून बदलणार तुमचा iPhone, नव्या फीचर्ससाठी अपडेट करा मोबाइल

iPhone SE 3 मधील फिचर

iPhone SE मध्ये ए१५ बायोनिक चिप देण्यात आली जी आयफोन १३ मध्ये देखील मिळते. हा फोन सिंगल चार्ज वर १५ तास व्हिडीओ प्लेबॅक करू शकतो, असा दावा अ‍ॅप्पलनं केला आहे. फोनमध्ये ४.७ इंचाचा छोटा डिस्प्ले देण्यात आला आहे, त्यामुळे हा एक कॉम्पॅक्ट फोन बनतो. iPhone SE 3 ला आयओएस १७ चा अपडेट मिळेल त्यामुळे नवीन फिचर येतील. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रियर कमाईत देण्यात आला आहे, तर ७ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही आहे.

Source link

cheapest iphoneiphone se 3iphone se 3 64gbiphone se 3 flipkartiphone se 3 priceअ‍ॅप्पलआयफोन एसई ३
Comments (0)
Add Comment