कर्नाटकातील शाळांमध्ये गणेशोत्सव सुट्टीचा पेच? वाचा काय आहे प्रकरण…

गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि त्या नजीकच्या काही राज्यांमध्ये मोठ्या दिमाखात साजरी केला जातो. कर्नाटकातही या उत्सवाचे स्वरूप प्रचंड व्यापक आहे. त्यामुळे या उत्सवा निमित्त शाळेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली जाते. काही ठिकाणी सुरूवातीचे पाच दिवस आणि अनंत चतुर्दशी अशी सुट्टी असते. तर काही राज्यांमध्ये गणेशोत्सवातील काही प्रमुख दिवसांचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन त्या ठरविक दिवशी सुट्टी दिले जाते.

पण यंदा गणेश चतुर्थीची सुट्टी कधी द्यायची यावरूनच मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण गणेश चतुर्थी सोमवार १८ सप्टेंबर रोजी आहे की मंगळवार १९ सप्टेंबर रोजी यावरून बराच वाद सुरू होता. त्यामुळे गणेश चतुर्थीची सुट्टी नेमकी कोणत्या दिवशी द्यायची यावरून शाळांमध्येही मोठा संभ्रम होता. परंतु कर्नाटक सरकारने सोमवार, १८ सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थीची सुट्टी जाहीर केली, आणि पेच आणखी वाढला.

(वाचा: MPKV Rahuri Recruitment 2023: महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज…)

कारण बहुसंख्य ठिकाणी गणेशचतुर्थी ही मंगळवार १९ सप्टेंबर रोजी साजरी करणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुट्टी एक दिवस अगोदर दिल्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळांची अडचण झाली आहे. शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाची सुटी सोमवारी असल्याचे जाहीर केले. त्यानंतरही यामध्ये बदल केला जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र त्यात बदल झाले नाहीत. त्यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.

तसेच कर्नाटकात दरवर्षी ‘ऋषीपंचमी’ दिवशी शाळांना स्थानिक सुटी देतात. बेळगाव शहर, तालुका आणि ग्रामीण भागात ऋषीपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे बुधवारी, २० तारखेला शाळा सुरू राहिल्या तरी विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थीच नसल्याने वर्ग कसे भरवायचे असा प्रश्न शाळांपूढे आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुटीच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली परंतु त्याला यश मिळाले नाही. परिणामी गणेशोत्सवातील सुट्टीचा निर्णय हा कर्नाटकातील शाळांना पअडचणीचा ठरताना दिसत आहे.

(वाचा: ICMR NARI Pune Bharti 2023: ‘राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था’ मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..)

Source link

Career Newseducation newsganeshotsav 2023ganeshotsav holiday for schoolsJob NewsSchool holidaysSchool NewsStudent news
Comments (0)
Add Comment