केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती! आजच करा अर्ज…

नागपुरमध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.सीआयसीआर म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे भारती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कॉम्प्युटर ऑपरेटर, यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II या पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे, ही मुलाखत प्रत्यक्ष स्वरुपात होईल. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३ च्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि मुलाखतीचे तपशील पुढीलप्रमाणे…

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती 2023

पदाचे नाव आणि पदसंख्या:
रिसर्च असोसिएट
सीनियर रिसर्च फेलो
कॉम्प्युटर ऑपरेटर
यंग प्रोफेशनल I
यंग प्रोफेशनल II
एकूण पदसंख्या – १९

शैक्षणिक पात्रता :
रिसर्च असोसिएट – अॅग्रीकल्चर मध्ये पीएचडी
सीनियर रिसर्च फेलो – एम. एससी अॅग्रीकल्चर
कॉम्प्युटर ऑपरेटर – बीसीए/ एमसीए
यंग प्रोफेशनल I – बी. एससी अॅग्रीकल्चर, बी.कॉम/ बीबीए
यंग प्रोफेशनल II – पदवीधर

वेतनश्रेणी:
रिसर्च असोसिएट – ४९ हजार ते ५४ हजार.
सीनियर रिसर्च फेलो – ३१ हजार.
कॉम्प्युटर ऑपरेटर – २६ हजार.
यंग प्रोफेशनल I – २५ हजार.
यंग प्रोफेशनल II – ३५ हजार.

(वाचा: Ganeshotsav School Holidays 2023: कर्नाटकातील शाळांमध्ये गणेशोत्सव सुट्टीचा पेच? वाचा काय आहे प्रकरण…)

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपोट जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर

मुलाखतीची तारीख: २६ व २७ सप्टेंबर २०२३

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची अधिकृत वेबसाईट : http://www.cicr.org.in

या भरती संबंधित सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1R6BCGtCz4nYs-jqib0ufLGIKHcBAvMgk/view या लिंकवर क्लिक करावे.

(वाचा: BMC Recrutiment 2023: सुवर्णसंधी! मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती; आजच करा अर्ज..)

Source link

Career Newscareer news marathiCICR Nagpur Bharti 2023CICR Nagpur recruitment 2023cicr recruitment 2023government job news marathigovernment jobsJob News
Comments (0)
Add Comment