आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी महाभरती! आजच करा अर्ज..

आयआयटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या आणि अणूऊर्जा विभागाच्या अखत्यारीतील ‘आण्विक इंधन कॉम्प्लेक्स’ म्हणजेच ‘एनएफसी’ (NFC) मध्ये विविध ट्रेड मधील अप्रेंटीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण २०६ रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अत्यंत मोठ्या स्वरुपातील ही भरती असून २० हून अधिक ट्रेडची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही नोकरी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ३० सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील पुढीलप्रमाणे…

‘आण्विक इंधन कॉम्प्लेक्स भरती २०२३’ बाबत सविस्तर माहिती…

पदाचे नाव आणि पदसंख्या:
या भरती अंतर्गत आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण २०६ जागा भरण्यात येणार आहे. त्याची ट्रेडनुसार वर्गवारी अशी की…

फिटर – ४२
टर्नर – ३२
प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) – ६
इलेक्ट्रिशियन – १५
मशीनिस्ट – १६
मशिनिस्ट (ग्राइंडर) – ८
परिचर ऑपरेटर (केमिकल प्लांट) – १५
केमिकल प्लांट ऑपरेटर – १४
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ७
मोटर मेकॅनिक – ३
लघुलेखक (इंग्रजी) – २
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – १६
वेल्डर – १६
मेकॅनिक डिझेल – ४
सुतार – ६
प्लंबर – ४
एकूण रिक्त जागा २०६.

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी परीक्षा आणि ‘आयटीआय’ अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा: उमेदवारचे वय किमान १८ वर्षे असावे.

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३

वेतन: या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना मासिक ७ हजार ७०० रुपये ते ८ हजार ५० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

‘आण्विक इंधन कॉम्प्लेक्स’ची अधिकृत वेबसाईट: http://www.nfc.gov.in

या भरती संबंधित सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1KiurlmnT62GWE9Icz5OJFU9GtesH77Gr/view या लिंकवर क्लिक करा.

Source link

Career Newscentral government jobGovernment jobJob NewsNfc bharti 2023Nfc recruitment 2023nuclear fuel complex jobsnuclear fuel complex recruitmentNuclear Fuel Complex recruitment 2023
Comments (0)
Add Comment