केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख..

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालया अंतर्गत येणार्‍या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (central pollution control board ) यांच्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीमध्ये ‘सल्लागार ‘ए’, सल्लागार ‘बी’, सल्लागार ‘सी’ या पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. असून ३१ ऑक्टोबर ही त्यासाठीची शेवटची तारीख आहे. या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सल्लागार भरती २०२३’बाबत सविस्तर माहिती..

पदाचे नाव आणि पदसंख्या:
सल्लागार ‘ए’ – १९
सल्लागार ‘बी’ – ५२
सल्लागार ‘सी’ – ३
एकूण रिक्त जागा: ७४

(वाचा: BMC Recrutiment 2023: सुवर्णसंधी! मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती; आजच करा अर्ज..)

वेतनश्रेणी:
सल्लागार ‘ए’ – ६० हजार रुपये
सल्लागार ‘बी’ – ८० हजार रुपये
सल्लागार ‘सी’ – १ लाख रुपये

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक ‘सल्लागार’ पदासाठीची पात्रता वेगळी असून त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. तसेच अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२३

केंद्रीय प्रदूषण मंडळाची अधिकृत वेबसाईट: www.cpcb.nic.in

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://cpcb.nic.in/openpdffile.php?id=Q2FyZWVyRmlsZXMvMjIzXzE2OTUyMDM1NjFfbWVkaWFwaG90bzEyNDA4LnBkZg== या लिंकवर क्लिक करा.

अर्ज कसा करावा..
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी https://cpcb.nic.in/jobs.php या लिंकवरून अर्ज कारचा आहे. अर्ज अर्ज करण्यापूर्वी एकदा सविस्तर अधिसूचना वाचावी. त्यात दिलेल्या पात्रतेच्या अटींमध्ये आपण उत्तीर्ण ठरतो आहोत का हे पहावे. तसे असल्यास अर्ज काळजीपूर्वक भरून सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. अर्ज पुन्हा एकदा वाचून एमजी सबमिट करावा.

(वाचा: NFC Recruitment 2023: आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी महाभरती! आजच करा अर्ज..)

Source link

Career Newscentral government jobcentral Pollution Control Boardcentral Pollution Control Board JobCPCB Recruitment 2023Government jobJob News
Comments (0)
Add Comment