ऑनर व्ही पर्सची किंमत
Honor V Purse स्मार्टफोन १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज आणि १६ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी व्हेरिएंटमध्ये येतो. ह्यातील बेस मॉडेलची किंमत RMB ५९९९ म्हणजे जवळपास ६९,८०० रुपये आहे. तर टॉप मॉडेल RMB ६५९९ म्हणजे जवळपास ७५,४०० रुपयांमध्ये विकला जाईल. हा फोन ग्लेशियर ब्लू, कॅमेलिया गोल्ड आणि एलिगेंट ब्लॅक अशा तीन कलरमध्ये उपलब्ध होईल. ऑनरनं काही दिवसांपूर्वी भारतात पुनरागमन केलं आहे, त्यामुळे कंपनी हा फोन देशात घेऊन येते का ते पहावं लागेल.
हे देखील वाचा: सावधान! पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय Android युजर्स, अशाप्रकारे करा बचाव
Honor V Purse चे स्पेसिफिकेशन्स
ऑनर व्ही पर्स मध्ये आउटवर्ड फोल्डिंग ऑलवेज-ऑन OLED डिस्प्ले आहे. यात ७.७१ इंचाची स्क्रीन आहे. जी फोल्ड केल्यावर ६.४५ इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. ह्या फोनचे डायमेंशन १५६.५ × ७४.७ × ८.६ मिमी (फोल्ड) आणि १५६.५ × १३५.६ × ४.३ मिमी (ओपन) आणि वजन २१५ ग्राम आहे.
ऑनर व्ही पर्समध्ये कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसरचा वापर केला आहे तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो ६४२एल जीपीयू आहे. जोडीला १६ जीबी रॅम व ५१२ जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Honor V Purse अँड्रॉइड १३ आधारित मॅजिकओएस ७.२ वर चालतो.
डिवाइसमध्ये एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
हे देखील वाचा: रेडमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय उद्या; परवडणाऱ्या किंमतीत Redmi Note 13 Series लाँचसाठी सज्ज
पावर बॅकअपसाठी ४५०० एमएएचची बॅटरी मिळते जी ३५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ह्यात ऑनर हिस्टेन ७.१ ऑडियो स्टीरियो स्पिकर, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सारखे अनेक फीचर्स आहेत. फोनमध्ये ड्युअल-सिम, ५जी, वायफाय ६ ८०२.११एएक्स, ब्लूटूथ ५.२, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास सारखे फीचर्स मिळतात.