१७ हजारांमध्ये आकर्षक ५जी फोन; लोकांच्या बजेटमध्ये बसावा म्हणून Vivo Y56 5G चा नवा व्हेरिएंट बाजारात

२०२३ च्या सुरुवातीला आलेल्या विवो वाय ५६ ५जी फोनचा नवा व्हेरिएंट बाजारात आला आहे. नव्या मॉडेल मध्ये कंपनीनं ४जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज दिली आहे. ह्याआधी उपलब्ध असलेल्या ८ जीबी रॅम मॉडेलला स्वस्त पर्याय म्हणून हा नवा पर्याय बाजारात आणला असावा. चला पाहूया नवीन Vivo Y56 5G ची किंमत आणि फीचर्स.

Vivo Y56 5G ची किंमत

विवो वाय५६ ५जी च्या नव्या ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर जुन्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १८,९९९ रुपये आहे. हा फोन Black Engine आणि Orange Shimmer कलरमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: वनप्लस मिळणार विवोकडून टक्कर; Vivo V29 series च्या लाँच डेटची घोषणा, पाहा फीचर्स

Vivo Y56 5G चे स्पेसिफिकेशन्स

ह्या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप डिजाइनसह येणारी ही स्क्रीन २४०८ × १०८० पिक्सल रिजोल्यूशन आणि ६०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. विवो वाय५६ ५जी अँड्रॉइड १३ आधारित फनटच ओएसवर चालतो.

प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबीची स्टोरेज मिळते. फोनमध्ये 8GB extendable RAM चा सपोर्ट असल्यामुळे रॅम वाढवता येतो. तर स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट पॅनलवर १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

हे देखील वाचा: जगावेगळ्या डिजाइनसह दुमडणारा Honor V Purse स्मार्टफोन लाँच, १६जीबी रॅमसह ७.७१ इंचाची भलीमोठी स्क्रीन

पावर बॅकअपसाठी Vivo Y56 5G फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ह्या मोबाइलमध्ये १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

Source link

vivoVivo Y56 5GVivo Y56 5G pricevivo y56 pricey56 5g priceविवोविवो वाय५६ ५जी
Comments (0)
Add Comment