NTA ने जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
वेळापत्रकानुसार, जेईई मेनचे पहिले सत्र २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान असेल. तर, परीक्षेचे दुसरे सत्र १ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान असेल. आयआयआयटी, एनआयटी आणि इतर महाविद्यालयांमध्ये बीटेक प्रवेशांसाठी जेईई मेन परीक्षा घेतली जाते. जेईई मेन परीक्षेत २.५ लाख रँक मिळविणाऱ्या उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी बोलावले जाते.
(वाचा : आयआयटी गुवाहाटीमध्ये ‘डेटा सायन्स’ आणि ‘एआय’ अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जाना सुरुवात; JEE दिलेल्या उमेदवारांना प्राधान्य)
NTA Timetable नुसार, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा म्हणजेच CUET UG परीक्षा १५ ते ३१ मे दरम्यान होणार आहे. तर, CUET PG ११ ते २८ मार्च दरम्यान घेण्यात येईल. परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाल्यानंतर, उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. सदर परीक्षांसाठी अर्ज करण्याच्या पायर्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा UGC NET 2024 चे पहिले सत्र १० ते २१ जून दरम्यान घेण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार संगणक आधारित या परीक्षांचे निकाल तीन आठवड्यांत जाहीर केले जातील. तर, NEET UG चा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. माहितीनुसार, लवकरच NTA नोंदणी सुरू करण्याच्या तारखा देखील जाहीर करेल. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी तपासू पुढे अर्ज करू शकतात.
(वाचा : NMC Recognition From WFME: डब्ल्यूएफएमई कडून एनएमसीला १० वर्षांसाठी मान्यता, MBBS च्या विद्यार्थ्यांना होणार हा फायदा)