बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व निकष

Mumbai Mahanagar Palika Jobs 2023: मुंबई महानगरपालिकेतील काही अस्थापनामध्ये विविध पदांच्या भरती सुरू आहेत. अशाच एका भरती संदर्भात नुकतीच अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यामुळे तुम्ही जर डॉक्टर असाल आणि पालिकेत काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत महापालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाची ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

ही पदे पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासाठी भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ७ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पात्रता, वेतन आणि नोकरीचे सर्व तपशील पुढीलप्रमाणे…

‘बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती २०२३’चे सविस्तर तपशील…

पदाचे नाव आणि पदसंख्या:
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या – ४

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून ‘एम.बी.बी.एस.’ असणे आवश्यक आहे. उमदेवार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदनिकृत असावा. सदर उमदेवारास एचएमआयएस (HMIS) या संगणकीय प्रणालीमध्ये रुग्णांची माहिती स्वतःला भरावी लागेल. त्यादृष्टीने आवश्यक ते संगणक ज्ञान त्याला असावे.

(वाचा: CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख..)

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतनश्रेणी: ७२ हजार रुपये

वयोमर्यादा: कमाल वयोमार्यादा ६२ वर्षे असावी, त्याहून अधिक असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकिय अधिक्षक, कस्तुरबा रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ ऑक्टोबर २०२३

पालिकेची अधिकृत वेबसाईट: portal.mcgm.gov.in

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1LMCuN0y7sPfPx8OQrFqM2Y7bI7M-OonX/view या लिंकवर क्लिक करा.

अर्ज कसा करावा: पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज ७ ऑक्टोबर आधी दिलेल्या पत्यावर पाठवावे. उशिरा प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महापालिकेत लवकरच महाभरती! २ हजार ७०० रिक्त पदे भरली जाणार; वाचा सविस्तर)

Source link

Assistant Medical Officer jobsbmc bharti 2023bmc jobsbmc recruitment 2023Career Newsdoctor vacancy in bmcGovernment jobJob Newskasturba hospital mumbai
Comments (0)
Add Comment