बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा डंका लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, जवानची कमाई किती?

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टी आपली विस्कटलेली घडी पुन्हा बसवू पाहत आहे. आता कुठं त्यात यश मिळू लागलं आहे, असं म्हणता येईल. वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’नं केलेल्या कमाईमुळं निर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर आलेले काही अपवाद वगळता, चित्रपटांनी चांगली कमाई केली. जानेवारी महिन्यात ‘पठाण’नं ५४३ कोटींची विक्रमी कमाई केल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट २०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला. त्यानंतर सलग चार चित्रपटांनी शंभर कोटींचा व्यवसाय केल्यानं पहिल्या सहामाहीत बॉक्स ऑफिसवर दोन हजार कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतर ओमजी २ सिनेमानंही चांगली कमाई केली. तर गदर २ नं ५०० कोटींच्यावर गल्ला जमवला. तर शाहरुखच्या जवाननं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस काबीज केलं आहे.
नेहमीच पहिली मुलगी हवी होती… राहुल वैद्यचा बिग बॉस १४ मधील व्हिडिओ व्हायरल

शहारुखचा जवान सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर १४ व्या दिवशी सिनेमानं ९.६ कोटींची कमाई केली होती. सिनेमा ५०० कोटींच्या कल्बमध्ये सामिल झाला असला तरी, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जवान हा या वर्षी प्रदर्शित झालेला दुसरा सिनेमा आहे. पठाणला बॉयकॉटचा सामना करावा लागला होता, तरीही सिनेमानं चांगली कमाई केली होती. पण जवानला मात्र प्रेक्षकांनी उचलून धरलं. भारतात सिनेमानं आतापर्यंत ५२६.८८ कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइड कमाईबद्दल बोलायचं झालं तर सिनेमा १००० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होऊ शकतो. बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा आकडा पार करणारा शाहरुख या वर्षीचा पहिला अभिनेता ठरलाय.
वडिलांनी जे आईसोबत केलं तेच तू आमच्यासोबत केलंय…सलमानच्या एक्सगर्लफ्रेंडचा आणखी एक खळबळजनक दावा
पठाण आणि जवान नंतर या वर्षी शाहरुखचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात शाहरुखचा डंकी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २२ डिसेंबर ही प्रदर्शनाची तारिख ठरली आहे. डंकी सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

कलाकारांची फौज
जवान या चित्रपटात नयनतारा, शाहरुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील छोट्या भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सर्वांशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक आणि संजय दत्त (कॅमिओ) सारखे अनेक कलाकार आहेत.

Source link

jawan box office collectionjawan box office collection worldwidejawan moviejawan movie box office collection worldwideShahrukh Khanshahrukh khan moviesshahrukh khan upcoming moviesजवान
Comments (0)
Add Comment