iPhone 15 ची विक्री आणि ऑफर्स
स्टोरेज | आयफोन १५ | आयफोन १५ प्लस | आयफोन १५ प्रो | आयफोन १५ प्रो मॅक्स |
१२८जीबी | ७९,९९० रुपये | ८९,९०० रुपये | १,३४,९०० रुपये | – |
२५६जीबी | ८९,९०० रुपये | ९९,९०० रुपये | १,४४,९०० रुपये | १,५९,९०० रुपये |
५१२जीबी | १,०९,९०० रुपये | १,१९,९०० रुपये | १, ६४,९०० रुपये | १,७९,९०० रुपये |
१टीबी | – | – | १,८४,९०० रुपये | १,९९,९०० रुपये |
हे देखील वाचा: एकच नंबर! २२ हजारांत १२ जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज; बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Motorola Edge 40 Neo ची एंट्री
जर तुम्ही आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून घेतले किंवा अॅप्पलकडून ईएमआयवर घेतले तर तुम्हला ५००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तर आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्सवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना ६००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
तुम्ही नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील तीन किंवा सहा महिन्यांसाठी घेऊ शकता. तसेच सुस्थितीत असलेला आयफोन एक्सचेंज करून तुम्ही ६७,८०० रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता.
iPhone 15 मध्ये काय आहे?
iPhone 15 आणि the iPhone 15 Plus मध्ये गेल्यावर्षीचा ए१६ बायोनिक प्रोसेसर आणि डायनॅमिक आयलंड मिळतो. त्याचबरोबर नवीन पेस्टल कलर आणि कर्व एज देखील ह्या फोन्समध्ये देण्यात आले आहेत.
तर प्रो मॉडेलमध्ये स्मूद एज आणि कमी वजन असल्यामुळे सहज हाताळतात येतात. ह्यात ३ नॅनोमीटर प्रोसेसवर बनलेली वेगवान ए१७ प्रो चिप देण्यात आली आहे. त्याचबरोबर ८जीबी रॅम, जास्त ब्राइट डिस्प्ले, वेगवान यूएसबी सी पोर्ट, टायटेनियम बॉडी आणि सुधारित कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: ६ महिन्यांचा इतका स्वस्त प्लॅन! BSNL चे दोन रिचार्ज नवीन प्लॅन झाले लाँच, पाहा किंमत
सीरिजमधील सर्वात शक्तिशाली फोन कोणता? तर तो आहे आयफोन १५ प्रो मॅक्स. ज्यात मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि ५एक्स झूम असे फिचर मिळतात. तसेच हा मॉडेल रिपेयर करण्याचा खर्च देखील जुन्या प्रो मॅक्स पेक्षा कमी असेल.