या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून ७ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीखआहे. कोचीन शिपयार्ड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करायचा याचे तपशील पुढीलप्रमाणे..
‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२३’चे सविस्तर तपशील:
पद आणि पदसंख्या:
मेकॅनिकल – २५
इलेक्ट्रिकल – १०
प्रोजेक्ट असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स – १०
इन्स्ट्रुमेंटेशन – ५
सिव्हिल – १
आयटी – १
फायनान्स – २
एकूण रिक्त पदे – ५४
(वाचा: Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महापालिकेत लवकरच महाभरती! २ हजार ७०० रिक्त पदे भरली जाणार; वाचा सविस्तर)
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा/ एम. कॉम आणि त्या क्षेत्रातील २ वर्षे कामाचा अनुभव.
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गाला किमान १८ ते कमाल ३० वर्षे. ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमार्यादेत ३ वर्षांची तर मागासवर्गीय प्रवर्गाला ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क: खुला/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गाला ६०० रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गाला शुल्क माफ आहे.
‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’ची अधिकृत बेवसाईट: https://cochinshipyard.com/
या भरती संबंधित सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1h4xieRqbNxAaaDZdu1lMNntEsaGIrCal/view या लिंकवर क्लिक करावे.
नोकरीचे ठिकाण: कोची.
अर्ज प्रक्रिया २० सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली असून ७ ऑक्टोबर २०२३ ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा: या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज विहित तारखेच्या आधी भरावा, ७ ऑक्टोबर नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व निकष)