Redmi Note 13 5G ची किंमत
रेडमी नोट १३ ५जी चे चार व्हेरिएंट बाजारात आले आहेत. बेस मॉडेल ६जीबी + १२८जीबी स्टोरेजसह १,१९९ युआन (जवळपास १३,९०० रुपये) मध्ये विकला जाईल. तर ८जीबी+१२८जीबी मॉडेल १,२९९ युआन (जवळपास १५,१०० रुपये), ८जीबी + २५६जीबी मॉडेल १,४९९ युआन (जवळपास १७,४०० रुपये) आणि १२जीबी + २५६जीबी मॉडेल १,६९९ युआन (जवळपास १९,७०० रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन Star sand white, Midnight dark आणि Time blue कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा: iPhone 15 सीरिजवर मिळवा मोठा डिस्काउंट; ईएमआयवर घेतल्यास कंपनीचं देतेय सूट, आजपासून सुरु झाली विक्री
Redmi Note 13 5G चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 13 5जी फोन २४०० x १०८० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.६७ इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १९२०पीडब्ल्यूएम डिमिंग तसेच १०००निट्झ ब्राइटनेसला सपोर्ट करते.
ह्या रेडमी फोनमध्ये ६नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो २.४गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी५७ जीपीयूला सपोर्ट करतो.
रेडमी नोट 13 5जी स्मार्टफोन रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह येतो. ह्या टेक्नॉलॉजीसह फोनच्या इंटरनल १२जीबी फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा ८जीबी रॅम जोडून २०जीबी रॅमची ताकद मिळवता येईल. रेडमी नोट 13 5जी फोन अँड्रॉइड १३ आधारित मीयुआय १४ वर चालतो.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 13 5G मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात १०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.
हे देखील वाचा: आता राडा होणार! १७,५०० मध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा; Redmi Note 13 Pro आणि Pro+ आले बाजारात
पावर बॅकअपसाठी Redmi Note 13 5G मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी ३३वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तसेच ह्यात ६ ५जी बँड्स, Wi-Fi 5GHz, Bluetooth ५.३, ३.५ मिमी जॅक आणि Infrared असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. तर आयपी५४ रेटिंगमुळे हा काही प्रमाणात वॉटर व डस्टप्रूफ बनतो. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.