प्राध्यापकांसाठी सुवर्णसंधी! ‘एमपीएससी’अंतर्गत महाराष्ट्रात अभियांत्रिकी शिक्षक भरती..

राज्यातील बर्‍याच उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक पदांच्या जागा रिक्त आहेत. आता अभियांत्रिकी शिक्षक गटातील काही महत्वाच्या पदांची भरती ‘एमपीएससी’ म्हणजेच (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील ‘सहायक प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे.

अभियांत्रिकी शिक्षण ‘गट-अ’ मधील या भरतीसाठी २५ सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली होती, परंतु आता याला मुदतवाढ दिली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून यासाठीची शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमार्यादा आणि इतर तपशील पुढीलप्रमाणे….

‘महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ’ पद भरती २०२३’ विषयी सविस्तर माहिती…

पद आणि पदसंख्या:

स्थापत्य अभियांत्रिकी – ३६ पदे

यंत्र अभियांत्रिकी – ८ पदे

विद्युत अभियांत्रिकी – १८ पदे

संगणक अभियांत्रिकी – २२ पदे

अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी – २१ पदे

उपयोजित यंत्रशास्त्र – १ पदे

पदार्थ विज्ञान – ७ पदे

रसायन शास्त्र – ५ पदे

गणित – ९ पदे

इंग्रजी – ८ पदे

फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट – २ पदे

कर्मशाळा अधीक्षक – ६ पदे

धातूशास्त्र – ४ पदे

एम.सी.ए. – २ पदे

एकूण पदसंख्या – १४९

(वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांची भरती! आजच करा अर्ज..)

पात्रता: संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा समतूल्य पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी, त्याची लिंक खाली जोडली आहे.,

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गास किमान १९ ते कमाल ४० वर्षे; मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/खेळाडू यास १८ ते ४५ वर्षे तर दिव्यांग उमेदवारास ४७ वर्षे.

वेतन श्रेणी: ५७ हजार ७०० आणि अनुज्ञेय भत्ते.

निवड पद्धती: या पदांकरिता उमेदवारांची संख्या अधिक असल्याने शैक्षणिक अर्हता, अनुभव पाहून तसेच चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात केली जाईल. चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत होईल आणि दोहोंच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

भरतीचे तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://mpsc.gov.in/downloadFile/english/7741 या किंवा https://mpsc.gov.in/downloadFile/english/7650 या लिंक वर क्लिक करावे.

(वाचा: BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व निकष)

Source link

Assistant Professor jobCareer NewsGovernment jobJob NewsMaharashtra Engineering Teachers Services jobsmpsc job 2023mpsc jobs 2023MPSC Recruitment 2023
Comments (0)
Add Comment