‘ओएनजीसी’ मध्ये भरती! पदवीधर आणि आयटीआय उमेदवारांनो आजच करा अर्ज..

ONGC Recruitment 2023: ‘ओएनजीसी’ (Oil and Natural Gas Corporation) म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या ४४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही अर्ज प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाली असून ३० स्पटेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भातील आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील पुढीलप्रमाणे..

‘ओएनजीसी अप्रेंटीस भरती २०२३’ (ONGC Apprentice Recruitment 2023) बाबत सविस्तर माहिती:

या भरती प्रक्रियेतील पदाचे नाव आणि पदसंख्या:
अप्रेंटिस – ४४५
एकूण पदसंख्या – ४४५
(या पदांची प्रांतावर आणि विभागावर झालेली विभागणी अधिसूचनेत वाचता येईल.)

(वाचा: BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व निकष)

नोकरीचे ठिकाण: भारतातील ‘ओएनजीसी’च्या काही प्रमुख केंद्रावर.

वेतन: पदवी प्राप्त उमेदवारांना मासिक ९ हजार तर डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना मासिक ८ हजार इतका प्रशिक्षणार्थी भत्ता (स्टायपेंड) दिला जाईल.

शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: किमान १८ ते कमाल २४ वर्षापर्यंत असेल. ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमार्यादेत ३ वर्षांची तर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत असेल.

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

महत्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – २१ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

अधिक महितीसाठी ‘ओएनजीसी’ची अधिकृत वेबसाईट – http://www.ongcindia.com

तसेच या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/19PKEtJ3ENP3oM8TsM4ifXMEXhrUzJodu/view या लिंकवर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा: या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. शेवटच्या तारखेनंतर म्हणजे ३० सप्टेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांची भरती! आजच करा अर्ज..)

Source link

Career NewsGovernment jobJob Newsongc apprentice recruitment 2023ongc jobsongc jobs 2023ongc recruitmentONGC Recruitment 2023
Comments (0)
Add Comment