‘भारत डायनॅमिक्स लिमिटेडम भरती २०२३’विषयी सविस्तर माहिती…
पदाचे नाव आणि पदसंख्या
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – ४२ पदे (विविध ट्रेड मधील)
कल्याण अधिकारी – २ पदे
कनिष्ठ व्यवस्थापक – १ पदे
एकूण पदसंख्या – ४५ पदे
वेतनश्रेणी:
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी: ४० हजार ते १ लाख ४० हजार
- कल्याण अधिकारी: ३० हजार ते १ लाख २० हजार
- कनिष्ठ व्यवस्थापक: ३० हजार ते १ लाख २० हजार
(वाचा: ONGC Recruitment 2023: ‘ओएनजीसी’ मध्ये भरती! पदवीधर आणि आयटीआय उमेदवारांनो आजच करा अर्ज..)
शैक्षणिक पात्रता: संबंधित भरतीसाठी पदांनुसार आवश्यक पदवी परीक्षा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ अधिसूचना वाचावी. अधिसूचनेची लिंक खाली दिली आहे.
नोकरी ठिकाण: अमरावती, महाराष्ट्र
वयोमर्यादा: प्रत्येक पदासाठी वेगळी वयोमर्यादा असून काही पदांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदासाठी २७ तर उर्वरित पदांसाठी २८ ही कमाल वयोमर्यादा आहे. कमाल वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गांना सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क: या भरतीकरीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गाला शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ ऑक्टोबर २०२३.
या भरतीकरिता भारत डायनॅममिक्सचे अधिकृत संकेतस्थळ: bdl-india.in
भारत डायनॅमिक्सच्या या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी https://i-register.co.in/sagarreg23/Home.aspx या लिंकवर क्लिक करावे. यातील होम पेजवर Advertisement (जाहिरात) या पर्यायावर क्लिक करून सविस्तर अधिसूचना वाचावी.
(वाचा: BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व निकष)