राज्य सरकारच्या बहुजन कल्याण विभागात लवकरच महाभरती! ८२१ रिक्त पदांना मान्यता..

सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी लवकरच सुवर्णसंधी येणार आहे. नुकतीच राज्य शासनाने एका भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. राज्य सरकार अंतर्गत येणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये ८२१ पदांची भरती करण्यात येणार आहेत. ही पदभरती बाह्ययंत्रणेव्दारे केली जाणार असून त्या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायार्लयासह इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेेवरील क्षेत्रीय कार्यालयाकरीता विविध पदे भरण्यात येणार आहेत. नुकतीच या भरतीच्या सुधारित आकृतीबंंधास मान्यता देण्यात आली. त्यामुळे या भरतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आहे.

या विभागात नियमित पद भरती होणे अपेक्षित होते परंतु तसे न होता बाह्ययंत्रणेमार्फत पदे भरली जाणार आहेत. या शासन निर्णया नुसार मागास बहुजन कल्याण विभागाची क्षेत्रीय कायालये, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, विभागाच्या अधिनस्त असलेली महामंडळे, स्वायत्त संस्था व वसतीगृहे इत्यादींच्या आस्थापनेवरील विविध पदे भरली जाणार आहेत. ही पदभरती थेट शासनाकडून होणार नसून त्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेला (एजन्सीला) मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळेही सरकारी नियमित पदभरती नसेल, याबाबत शासनाने आधीच स्पष्टता दिली आहे.

(वाचा: Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांची भरती! आजच करा अर्ज.. )

इतर बहुजन कल्याण विभाग साडेपाच वर्षांपूर्वी स्थापन झाले. पण, या विभागाला कर्मचारी मिळाले नाहीत. परिणामी नागपूरातील महाज्योती संस्था, पुण्यातील संचालनालय आणि प्रादेशिक कार्यालयातून मनुष्यबळाअभावी अनेक कल्याणकारी योजना लोकापर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून अखेर राज्य सरकारने ८२१ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बहुजन विकास मंडळातील ही पदे भरण्यासाठी विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयाकरीता त्याचप्रमाणे विभागांतर्गत कार्यरत महामंडळे आणि स्वायत्त संस्थेसाठी केल्या जाणार्‍या या पदभरतीची जबाबदारी ‘मे.ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ यांना दिल्याचे समजते आहे. तशी अधिकृत मंजूरी मिळाल्याचेही बोलले जात आहे. तर ३० सप्टेंबंर नंतर ‘मे.एस-2 इन्फोटेक इंटरनॅशनल लि’ कडून नमूद आस्थापनेवरील बाहयस्त्रोताव्दारे भरावयाच्या पदासाठी सदर एंजसीला मनुष्यबळ पुरवठा करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव कैलास सांळुखे याच्या स्वाक्षरीने निघालेल्या शासन निर्णयात दिले आहेत.

(वाचा: BDL Recruitment 2023: भारत डायनॅमिक्स मध्ये विविध पदांची भरती! जाणून घ्या पदे, पात्रता आणि अर्जप्रक्रिया..)

Source link

Career NewsCareer News In MarathiGovernment jobJob NewsMaha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023maharashtra government jobsOther Backward Bahujan Welfare Department bharti
Comments (0)
Add Comment