केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे वरिष्ठ लेखापाल पदाकरिता भरती! आजच करा अर्ज..

लेखापाल म्हणजेच अकाउंट पदासाठी भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मुंबईतील पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि प्रख्यात मानल्या जाणाऱ्या सेठ जी.एस. मेडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट अंतर्गत भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ लेखापाल पदाची ०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून आज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन आणि ईमेल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ३० सप्टेंबर २०२३ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज करण्याचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

‘केईएम हॉस्पिटल, मुंबई वरिष्ठ लेखापाल भरती २०२३’ संदर्भात सविस्तर माहिती…

पदाचे नाव पदसंख्या:
वरिष्ठ लेखापाल – १ जागा
एकूण पदसंख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून बी.कॉम/ एम. कॉम पदवीधर असणे आवश्यक आहे. किंवा सीए. इंटर्न उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

(वाचा: MITC Recruitment 2023: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..)

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतनश्रेणी: उमेदवाराच्या शिक्षण आणि अनुभवावर ठरवले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन आणि ईमेल द्वारे ऑनलाईन

निवड प्रक्रिया: थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

अर्ज पाठविण्याचा आणि मुलाखती साठीचा पत्ता: डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट, पहिला मजला, कॉलेजची इमारत, डीन कार्यालयाच्या वर, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४०० ०१२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: dist6513@gmail.com

या भरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1oLE-XkjsqpLdV2yFA0jXctto9gJrfdbl/view?pli=1 या लिंकवर क्लिक करून अधिकृत अधिसूचना वाचावी.

रुग्णालयाची अधिकृत वेबसाईट: https://www.kem.edu/

अर्ज कसा करावा: सदर पदांकरिता अर्ज करण्यासाठी आपले सर्व तपशील ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. तसेच वर नमूद केलेल्या ईमेल आयडीवरही अर्ज करायचा आहे. हे अर्ज ३० सप्टेंबर २०२३ या तारखेच्या आधी करणे गरजेचे आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. मुलाखतीची तारीख आणि वेळ दूरध्वनीद्वारे कळवली जाईल.

(वाचा: ONGC Recruitment 2023: ‘ओएनजीसी’ मध्ये भरती! पदवीधर आणि आयटीआय उमेदवारांनो आजच करा अर्ज..)

Source link

Career NewGovernment jobJob Newsjobs in hospitalKEM Hospital Mumbai Recruitment 2023kem hospital recruitment 2023Mumbai jobsSenior Accountant job
Comments (0)
Add Comment