बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम! सांगलीमध्ये सोमवारी शासनाचा रोजगार मेळावा..

सध्या राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. देशासह राज्यामध्ये वाढत असलेला रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन त्यावर ठोस उपाय करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. शासन रोजगाराच्या संधी घेऊन जिल्हया-जिल्ह्यात पोहोचत आहे. या मार्फत तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. सोमवारी, २५ स्पटेंबर रोजी सांगली जिल्ह्यात शासनाचा रोजगार मेळावा होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सध्या राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ रोजगार योजनेच्या (जागेवरच निवड) माध्यमातून हा रोजगार मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्हया-जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देखील मिळवून दिला जातो. या अंतर्गत ६०० हून अधिक उमेदवारांना सांगली येथे रोजगार मिळणार आहे.

(वाचा: KEM Hospital Mumbai Recruitment 2023: केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे वरिष्ठ लेखापाल पदाकरिता भरती! आजच करा अर्ज..)

सांगली येथे होणार्‍या या रोजगार मेळाव्यात व्हीएमसी आणि एचएमसी ऑपरेटर, सीएनसी व्हीटीएल ऑपरेटर, शिफ्ट सुपरटिव्हीझर, टर्नर, वेल्डर, व्हीएमसी ऑपरेटर, एचएमसी ऑपरेटर, व्हीटीएल सीएनसी ऑपरेटर, सीएनसी एम/सी ऑपरेटर,मदतनीस, इलेक्ट्रिशियन,अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी इन्स्पेक्टर, सेल्स असिस्टंट/ऑफिस क्लर्क, शिफ्ट पर्यवेक्षक, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, प्रेस मशीन ऑपरेटर, टर्नर या व यांसारख्या अन्य पदांकरीता उमेदवार निवडले जाणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी mahaswayam.gov.in या लिंक वर नोंदणी करायची आहे. या नोंदणी नंतर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे. या मेळाव्यात ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.

तसेच https://rojgar.mahaswayam.gov.in/ या लिंकवर क्लिक करून होम पेज वरील सांगली जिल्ह्याच्या पर्यायावर क्लिक करावे. तिथे भरतीचे आणि पदांचे सर्व तपशील प्राप्त होतील.

रोजगार मेळाव्याची तारीख: २५ सप्टेंबर २०२३

शैक्षणिक पात्रता: संबधित पदाला आवश्यक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचे तपशील वरील लिंक मध्ये दिलेले आहे.

नोकरीचे ठिकाण: सांगली

मेळाव्याचा पत्ता: मिरज महाविद्यालय, मिरज,शासकिय दूध संकलन शेजारी, मिरज.

(वाचा: ONGC Recruitment 2023: ‘ओएनजीसी’ मध्ये भरती! पदवीधर आणि आयटीआय उमेदवारांनो आजच करा अर्ज..)

Source link

Career NewsCareer News In MarathiGovernment jobjob fair sangli 2023Job Newspandit deendayal rojgar melava sanglirojgar melava sangli 2023Sangli job fairshasan aplya dari rojgar melavashasan aplya dari sangli 2023
Comments (0)
Add Comment