या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे असून २७ स्पटेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि पदांबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…
‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली शिक्षक भरती २०२३’चे सविस्तर तपशील..
पदाचे नाव आणि पदसंख्या:
उच्च माध्यमिक शिक्षक – १३ जागा
माध्यमिक शिक्षक – ७ जागा
पदवीधर प्राथमिक शिक्षक – २ जागा
प्राथमिक शिक्षक – १८ जागा
एकूण पद संख्या – ४० जागा
शैक्षणिक पात्रता:
उच्च माध्यमिक शिक्षक – एमए/एमएससी/बी.एड
माध्यमिक शिक्षक – बीएससी/ बीए/ बी.एड
पदवीधर प्राथमिक शिक्षक – बीए/ बीएड
प्राथमिक शिक्षक – बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि डी.एड
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज पद्धती: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: थेट मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रकल्प कार्यालय, अहेरी, जिल्हा- गडचिरोली
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट: gadchiroli.gov.in
या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात/अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/13IwRS6WWSkHz8A4aFc–OeYO08ZWq7LN/view या लिंकवर क्लिक करा.
अर्ज कसा करावा: उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार एका वेळी फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज अंतिम मुदतीनंतर म्हणजेच २७ सप्टेंबर नंतर स्वीकारले जाणार नाहीत.
(वाचा: ONGC Recruitment 2023: ‘ओएनजीसी’ मध्ये भरती! पदवीधर आणि आयटीआय उमेदवारांनो आजच करा अर्ज..)