शाहरुख खानपुढे कोणाचं काय चालतंय! विकीचा सिनेमा मजबूत आपटला; शिल्पाच्या सिनेमाचीअशी अवस्था

मुंबई: विकी कौशलची मुख्य भूमिका असणारा फॅमिली ड्रामा सिनेमा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र दोन दिवसात सिनेमाला अजिबात चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. Sacnilk.com ने दिलेल्या वृत्तानुसार, रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली नाही. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाने अवघे १.८० कोटी रुपये कमावले. शुक्रवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १.४ कोटींची ओपनिंग केली होती.

जवानची घौडदौड

दुसरीकडे, एटली दिग्दर्शित शाहरुख खानच्या जवानने तिसर्‍या शनिवारी बॉक्स ऑफिसवर ७० टक्क्यांची उडी घेतली आहे. २३ सप्टेंबर रोजी ‘जवान’ने १२ कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनची एकूण कमाई सुमारे ५४५.५८ कोटींवर पोहोचली आहे. रविवारी या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘पठाण’ आणि ‘गदर २’ नंतर ‘जवान’ हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट आहे आणि तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस तो य सिनेमांमा कमाईच्या बाबतीत मागे टाकेल असे चित्र आहे.

तेजश्री प्रधान पुन्हा जुई गडकरीवर पडली भारी; ‘ठरलं तर मग’ला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ TRP मध्ये अव्वल
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ बॉक्स ऑफिस रिपोर्ट

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित द ग्रेट इंडियन फॅमिली हा यशराज फिल्म्सचा सिनेमा आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाने फक्त १.८० कोटींची कमाई केली आहे. यानंतर दोन दिवसात सिनेमाची एकूण कमाई ३.२० कोटी रुपये झाली आहे. विकीव्यतिरिक्त या सिनेमात मानुषी छिल्लर, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सादिया सिद्दीकी आणि अलका अमीन यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा विकीच्या भजन कुमार या पात्राभोवती फिरतो. भजन गाण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा भजन कुमार त्याच्या प्रेयसीच्या शोधात असतो. त्याला मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा त्याला समजतं की त्याचा जन्म एका मुस्लिम घरात झाला आहे.

‘द ग्रेट इंडियन फॅमिली’वर ‘जवान’ पडला भारी

विकीचा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊनही प्रेक्षकांची पसंती ‘जवान’ला आहे. शाहरुख-एटलीचा हा चित्रपट केवळ ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’पेक्षा जास्त कमाई करत नसून, ६-७ पाटींनी जास्त कमाई करत आहे. दरम्यान आता ‘फुकरे ३’ रिलीज झाल्यानंतर ‘जवान’चे कलेक्शन पाहणे अधिक रंजक ठरेल. एकंदरित काही अडथळे येऊनही २०२३ हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप चांगले गेले. यावर्षी बरेचसे सिनेमे बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करण्यात यशस्वी ठरले. अद्याप ‘टायगर ३’, ‘एनिमल’ आणि ‘डंकी’ सारखे चित्रपट रिलीज होणे बाकी आहे.

‘तिच्यासोबत मीही मेलो…’ लेकीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची काळजात चर्रर करणारी पोस्ट
‘सुखी’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दरम्यान, शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ हा चित्रपटदेखील २२ सप्टेंबरला रिलीज झाला होता. या सिनेमाची दोन दिवसांची कमाईदेखील कोटींच्या घरात पोहोचली नाही. चित्रपटातील आकडेवारी धक्कादायक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही. पहिल्या दिवशी ३० लाख रुपये आणि दुसऱ्या दिवशी ४० लाखांची कमाई ‘सुखी’ने केली.

विजय सेतूपतीचा आग्रह अन् शाहरुख म्हणाला, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

Source link

jawan box office day 17jawan collectionjawan total collectionshilpa shetty sukhee box officesukhee box office day 2the great indian family box office day 2the great indian family collectionजवान बॉक्स ऑफिस कलेक्शनद ग्रेट इंडियन फॅमिली बॉक्स ऑफिस कलेक्शनसुखी बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment