MCC च्या अधिकृत वेळापत्रकानुसार, जागा वाटप प्रक्रिया २६ ते २७ सप्टेंबर दरम्यान पार पडेल. तर, तिसर्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल २८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असेल.
(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)
NEET PG 2023 साठी असा करा अर्ज :
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर राउंड-3 नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- आता लॉग इन करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर, एक प्रिंट काढा आणि आपल्याजवळ ठेवा.
तिसर्या फेरीच्या जागा वाटपानंतर MCC ९ ऑक्टोबर रोजी ‘स्ट्रे व्हेकन्सी राऊंड’ सुरू करेल. वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया ११ क्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर या फेरीच्या जागावाटपाचा निकाल १४ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयांना भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
(वाचा : NMC Recognition From WFME: डब्ल्यूएफएमई कडून एनएमसीला १० वर्षांसाठी मान्यता, MBBS च्या विद्यार्थ्यांना होणार हा फायदा)
अलीकडेच शिक्षण मंत्रालयाने NEET PG चा पर्सेंटाइल शून्यावर आणल्यामुळे NEET PG परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी समुपदेशनात सहभागी होऊ शकतील.
मात्र, एनईईटी पीजीची टक्केवारी शून्य करण्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे. मंत्रालयाच्या या निर्णयाला अनेक वैद्यकीय संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही याविरोधात आंदोलन केले आहे. काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल करत भाजप नेत्यांची मुले आणि नातेवाईक आणि इतर नातेवाईकांसाठी शून्य टक्केवारीचा नियम लागू करण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.
(वाचा : NExT Entrance Exam Updates: MBBS विद्यार्थ्यांसाठी NMC ने जारी केली मार्गदर्शक तत्वे, ‘नेक्स्ट’बाबत मोठी घोषणा)