कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर येथे सहाय्यक पदासाठी भरती! आजच करा अर्ज..

KVK Kolhapur Recruitment 2023: कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी नोकरीची एक खास संधी चालून आली आहे. तुम्ही जर वाणिज्य शाखेतून पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर हि नोकरी तुमच्यासाठी पर्वणी आहे. कृषि विज्ञान केंद्र, कणेरी -कोल्हापूर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहेत. या भरतीच्या माध्यमातून ‘सहाय्यक’ पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन आणि नोकरीचे सर्व तपशील पुढीलप्रमाणे..

‘कृषि विज्ञान केंद्र, कणेरी -कोल्हापूर भरती २०२३’ विषयी सविस्तर माहिती:

पदाचे नाव आणि पदसंख्या:
सहाय्यक – ०१ जागा
एकूण रिक्त ०१ जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वाणिज्य शाखेतून पदवी उत्तीर्ण आणि फायनान्स शाखेतून एमबीए केले असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संबधित उमेदवारास फायनान्स, अकाऊंट आणि तत्सम कामाचा अनुभव आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

वयोमर्यादा: किमान २० आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी.

अर्ज शुल्क: ५०० रुपये.

अर्ज पद्धती: ऑफलाईन

(वाचा: FTII Pune Recruitment 2023: एफटीआयआय, पुणे येथे मुख्य लेखाधिकारी पदाची भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..)

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
आयसीएआर, श्री सिद्धगिरी मठ कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, कोल्हापूर – ४१६२३४.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ ऑक्टोबर २०२३

‘कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर’ यांची अधिकृत वेबसाईट: https://kvkkolhapur2.icar.gov.in

या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करावे.

वेतनश्रेणी: ९ हजार ३०० ते ३४ हजार ८०० यासह आवश्यक भत्ते समाविष्ट आहेत.

अर्ज कसा करावा: या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अंतिम मुदतीनंतर म्हणजेच २४ ऑक्टोबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना कृषि विद्यान केंद्राच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत. तसेच हा अर्ज करताना कागदपत्रे अपूरी राहिल्यास तो अर्ज अपात्र ठरवला जाईल.

मुलाखत: या भरतीकरिता उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी यांना कोणताही प्रवासी किंवा निवासी भत्ता दिला जाणार नाही. सविस्तर माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे.

(वाचा: KEM Hospital Mumbai Recruitment 2023: केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे वरिष्ठ लेखापाल पदाकरिता भरती! आजच करा अर्ज..)

Source link

Career NewsCareer News In MarathiGovernment jobJob Newskirishi vigyan kendra bharti 2023kolhapur jobsKrishi Vigyan Kendra Kaneri Kolhapur jobsKVK Kolhapur Bharti 2023
Comments (0)
Add Comment