UGC ने यासंबंधीचे ट्वीट करत सर्व शैक्षणिक संस्थांना एबीसी आयडीच्या आधारे गुणदानाची प्रक्रिया राबविण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये UGC ने म्हटलं आहे; “सर्व शैक्षणिक संस्थांनी एबीसी पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना श्रेयांकाचे हस्तांतरण (Transfer of credits) सुलभ होईल, यासाठी प्रयत्न करावेत.” आतापर्यंत देशभरातील एक हजार ५९७ संस्थांमधील दोन कोटी विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी तयार केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३० लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वच विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांनी ‘ABC’ खात्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरण्यास सुरवात केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राने आघाडीवर असून, नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशात चौथ्या क्रमांकावर तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
(वाचा : CBSE Exams 2024: सीबीएसई बोर्डाच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल; दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधला हा मोठा बदल)
ABC ID म्हणजे काय?
ज्याप्रमाणे आपण बॅंकेतील खात्यात जमा केलेली रक्कम आपण कोठेही आणि केव्हाही काढू शकतो. अगदी तसेच विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले श्रेयांक(Credits) या आयडीच्या माध्यमातून ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडीटमध्ये जमा होतील. विद्यार्थ्याला जेंव्हा पदवी प्राप्त करायची असेल, तेंव्हा शैक्षणिक संस्था या श्रेयांकाचा वापर करू शकते. विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन आयडी ओपन करू शकतात.
विद्यार्थ्यांना होणार हे फायदे :
१. विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांतून मिळालेली श्रेयांक सहज हस्तांतरित होतील.
२. ‘गॅप’ घेऊन परतलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा बॅंकेतील श्रेयांक वापरता येतील.
३. आवडते किंवा कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांच्या गुणदानाची प्रक्रिया सुलभ होईल.
४. देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून श्रेयांक प्राप्त करात येईल.
ABC ID क्रमवारीतील देशातील पाच संस्था अनुक्रमे
1. स्किल इंडिया डिजिटल ४४,३४,५५३
2. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ : २०,२७,७०७
3. दिल्ली विद्यापीठ १०,१९,८३७
4. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र : ६,१०,४९७
5. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र : ५,२६,७६८
(वाचा : Mathematics Phobia: गणितात कमी मार्क्स मिळण्याची तुम्हालाही भीती वाटते का? या ७ टिप्स वापरा Math चे टेन्शन पळून जाईल)
महाराष्ट्रामध्ये अशी आहे स्थिती
एकूण सहभागी संस्था : १८४
एबीसी आयडी : ३० लाख ८४ हजार २५९
श्रेयांक भरलेले एबीसी आयडी : २ लाख ७२ हजार ६६
एबीसी आयडीसहित क्रेडिट रेकॉर्ड उपलब्ध : ३ लाख ६४ हजार ७६३
(महाराष्ट्रामधील माहिती २५ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत)
एबीसी आयडीचे संकेतस्थळ : https://www.abc.gov.in/
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर म्हणतात; “एका संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इतर ठिकाणचे अभ्यासक्रम शिकणे सुलभ व्हावे, म्हणून ही (ABC ID for College Students) संकल्पना राबविण्यात आली आहे. महाविद्यालयांनी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याचा एबीसी आयडी क्रमांक खोलावा. तसेच विद्यापीठांनी यासंबंधी विशेष शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्याला याचा फायदा होईल.
(वाचा : RaghNeeti Education: Scholars असणाऱ्या परिणिती-राघवची लग्नगाठ, दोघेही होते हुशार विद्यार्थी जाणून घ्या या दोघांचे शिक्षण)