मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर; ऑक्टोबर महिन्याच्या या दिवसापासून परीक्षेला सुरुवात

Mumbai University Exams 2023-24: मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हिवाळी सत्राच्या या परीक्षा ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहेत. परीक्षेच्या तारखेसोबतच ८४ परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.

यातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ ची परीक्षा २६ ऑक्टो. तर तृतीय वर्ष बीए व बीएस्सी सत्र ५ च्या परीक्षा ३० ऑक्टोबर, बीए एमएमसी सत्र ५ ची परीक्षा २४ नोव्हेंबर व बीकॉम स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रमाच्या सत्र ५ च्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर :

विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या ५०० पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६८ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ६३ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या २४० परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ६८ अशा एकूण ४३९ परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)

८४ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर :

परीक्षेच्या तारखेसोबतच ८४ परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर, उर्वरित इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येईल.

परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले असून ते तयार करताना त्या त्या विद्याशाखांचे ९० दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात यावर्षीपासून उत्कृष्ट संशोधक, संशोधन निधी आणि उत्कृष्ट विभाग पुरस्कार)

विद्यापीठाच्या परीक्षा आणि परीक्षांची तारीख :

१. बीकॉम सत्र ५ : २६ ऑक्टोबर २०२३

२. बीए सत्र ५ : ३० ऑक्टोबर २०२३

३. बीएस्सी सत्र ५ : ३० ऑक्टोबर २०२३

४. बीएस्सी आयटी सत्र ५ : २४ नोव्हेंबर २०२३

५. बीए एमएमसी सत्र ५ : २४ नोव्हेंबर २०२३

६. बीकॉम फिनांशियल मार्केटस, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट आणि बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५ : १ डिसेंबर २०२३

विद्याशाखा निहाय परीक्षा संख्या :

मानव्य विद्याशाखा व विधी शाखा : ६८
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ६३
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : २४०
आंतर विद्याशाखा : ६८

शिवाय, यंदाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा नियोजित वेळेवर घेणे, वेळेत मुल्यांकन करून निर्धारित वेळेत निकाल जाहिर करणे याचे नियोजन करण्यात आलेले असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र-युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषदेचे आयोजन)

Source link

exam time tablehttps:mu.ac.inmu exam tt 2023-24MU Examsmumbai universityMumbai University Exammumbai university exams 2023-24mumbai university winter sessionsuniversity of mumbaiमुंबई विद्यापीठ परीक्षा स्थगित
Comments (0)
Add Comment