बॉलिवूडचा बादशाह एकच! शाहरुखच्या जवानचा जगभरात डंका, कमाई १००० कोटींच्यावर

मुंबई: शाहरुख खान… बस्स सिर्फ नाम ही काफी है..असं उगाच बोललं जात नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून उतरती कळा लागलेल्या बॉलिवूडला पुन्हा एकदा शाहरुखनंच वाचवल्याचं चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा पठाण आला, अनेक वादानंतरही सिनेमानं ५०० कोटींच्यावर कमाई केली. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या जवान सिनेमानं तब्बल१००० कोटींच्यावर कमाई केली आहे.

७ सप्टेंबर रोजी म्हणजे १८ दिवसांपूर्वी शाहरुखचा जवान प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यात दिवसापासून सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. १३ दिवसांत जवान सिनेमानं ५०० कोटींचा आकडा पार केला होता. सर्वात कमी दिवसांत ५०० कोटींची कमाई करणारा जवान पहिला हिंदी सिनेमा ठरलाय.
स्वरा-फहाद झाले आई बाबा,फोटो शेअर करत लेकीसाठी लिहिला मेसेज, नावही ठेवलं खूपच खास

जवान सिनेमानं १७ व्या दिवशी १२.२५ कोटींची कमाई केली. तर १८ दिवशी सिनेमानं तब्बल १४.९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुंळ सिनेमाची एकूण कमाई ही ६५०.७८ कोटी झाली आहे.

कमाईचा आकडा १००० कोटींच्यावर
जवान हा शाहरुखचा या वर्षी प्रदर्शित झालेला दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्याचा पठाण हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.पठाण सिनेमानंही जगभरात १००० कोटींच्यावर कमाई केली होती. तर आता जवान सिनेमानंही वर्ल्डवाइड १००० कोटींचा आकडा पार केलाय.

दरम्यान, शाहरुखच्या या बिग बजेट जवान या चित्रपटात कलाकारांची फौज आहे. यात नयनतारा, शाहरुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील छोट्या भूमिकेत आहे. काही मिनिटांसाठी ती असली तरी तिची जादू सिनेमात पाहायला मिळतेय. या चित्रपटात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सर्वांशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक आणि संजय दत्त (कॅमिओ) सारखे अनेक कलाकार आहेत.
बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा डंका लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, जवानची कमाई किती?
डंकी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, येत्या डिसेंबर महिन्यात शाहरुख खानचा या वर्षातला तिसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डंकी असं या सिनेमाचं नाव आहे.

Source link

jawan box office collectionjawan box office collection day 18jawan box office collection in marathijawan box office collection worldwidejawan moviejawan worldwide box office collectionshah rukh khanshah rukh khan jawanशाहरुख खान
Comments (0)
Add Comment