Tesla Optimus सर्वप्रथम गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित Tesla AI Day 2022 मध्ये सादर करण्यात आला होता. मस्कनं शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये Optimus हात आणि पाय दुमडू शकतो हे दिसत आहे. ह्यासाठी ज्वॉइंट इंकोडर्सचा वापर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: स्वस्तात मस्त फोनच नाही तर टॅबलेटही येणार; Samsung Galaxy S23 FE सह आणखी FE डिवाइस वेबसाइटवर लिस्ट
नमस्ते आणि योगासन
टेस्लाचा ह्यूमनॉइड रोबोट व्हिडीओच्या अखेरीस ‘नमस्ते’ म्हणत योगासन करत आहे. ह्या रोबोटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टूलचा वापर करण्यात आला आहे, जो टेस्लाच्या ऑटोमॅटिक कार्समध्ये वापरण्यात आला आहे. Tesla ह्याला अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम म्हणजे ऑटोपायलट सिस्टम म्हणत आहे. याची किंमत सुमारे २०,००० डॉलर म्हणजे जवळपास १६.४२ लाख रुपये आहे.
एलन मस्कची कंपनी Tesla ह्या रोबोटची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणार आहे. ह्याचे लाखो यूनिट्सची निर्मिती सुरु आहे. फीचर्स पाहता ह्यात २.३ किलो वॉटआवरचा बॅटरी पॅक मिळतो, जो ह्याला संपूर्ण दिवसाची एनर्जी देतो. हा टेस्लाच्या चिपवर चालतो आणि ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi सह LTE चा सपोर्ट देखील मिळतो.
हे देखील वाचा: आयफोनला टक्कर देणाऱ्या Google Pixel 8, 8 Pro ची किंमत लीक, पुढील आठवड्यात येणार बाजारात
मानवाप्रमाणे डिजाइन
Tesla Optimus ची मानवाकडून प्रेरणा घेऊन डिजाईन करण्यात आला आहे, त्यामुळे हा कोणतीही वस्तू सहज उचलतो मग तिचा आकार कोणताही असो. मस्कनं गेल्यावर्षी आयोजित झालेल्या AI Day इव्हेंटमध्ये सांगितलं आहे की ह्याच्या ह्यूमनॉइड रोबोटची किंमत २०,००० डॉलरपेक्षा कमी असू शकते. हा सहज २० पाउंडच्या बागेत टाकून कुठेही नेता येईल.