पदाचे नाव आणि पदसंख्या:
उपसंचालक – ०२
सहाय्यक संचालक – ०३
एकूण रिक्त्त पदसंख्या – ०५
(वाचा: KVK Kolhapur Bharti 2023: कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर येथे सहाय्यक पदासाठी भरती! आजच करा अर्ज..)
शैक्षणिक पात्रता:
उपसंचालक – कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा दहा वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
सहाय्यक संचालक – कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा सात वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वेतन: या भरतीतील उपसंचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ‘लेव्हल १२’ प्रमाणे तर सहाय्यक संचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ‘लेव्हल ११’ प्रमाणे पगार दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली – ११००६७
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑक्टोबर २०२३
‘एनटीआरओ’ची अधिकृत वेबसाईट: ntro.gov.in
या भरतीततील उपसंचालक आणि सहाय्यक संचालक पदाची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी ”या” लिंकवर क्लिक करा. तिथे संबधित भरतीच्या दिलेल्या पर्यायावर क्लिक करून अधिसूचना वाचावी.
अर्ज कसा करावा: वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा फॉर्म A-4 आकाराच्या कागदावर फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन वापरून इंग्रजी कॅपिटल /ब्लॉक अक्षरांमध्ये भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर म्हणजेच १४ ऑक्टोबर आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
(वाचा: Pune Jobs 2023: इंदिरा कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स,पुणे येथे विविध पदांची भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)