असे अॅड करा रिअॅक्शन स्टिकर्स
आता नवीन अपडेटमध्ये युजर्सना स्टोरीजवर रिअॅक्शन स्टिकर्स आणि म्यूजिक अॅड करण्याची सुविधा मिळते. युजर्स आणि चॅनेल्स रिअॅक्शन स्टिकर्स लावू शकतात आणि व्यूवर्स एका टॅपनं उत्तर देऊ शकतात. रिअॅक्शन स्टिकर जोडण्यासाठी युजर्सना स्टिकर पॅनलमध्ये आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतीही एक इमोजी निवडा. प्रीमियम युजर्स प्रत्येक स्टोरीमध्ये जास्तीत जास्त ५ रिअॅक्शन स्टिकर अॅड करू शकतात. इतर युजर्सना फक्त एक रिअॅक्शन स्टिकर जोडता येईल.
ऑगस्टमध्ये सर्व टेलीग्राम युजर्सना स्टोरीज फीचर मिळालं होतं. टेलीग्राम युजर्सना आपली स्टोरी कितीवेळ लोकांना दिसावी हे निवडता येतं, जे इंस्टाग्रामवर करता येत नाही. त्यामुळे तुम्ही ६, १२, २४ आणि ४८ तासांपैकी एक पर्याय निवडू शकता.
म्यूजिक अॅड करण्याची पद्धत
युजर्स ऑडियोमध्ये जाऊन फाइल सिलेक्ट करा. त्यानंतर ट्रॅक अॅड करण्याचा पर्याय निवडून तुमच्या स्टोरीमध्ये म्यूजिक जोडू शकता. तुम्ही ओरिजनल ऑडियो देखील सिलेक्ट करू शकता.
अन्य फिचर
व्हॉट्सअॅप प्रमाणे आता टेलीग्रामवर देखील व्यू-वन्स मोडसह मीडिया फाईल पाठवता येईल. युजर्स व्यू-वन्स सेटिंग आणि ३० सेकंड डिस्प्ले मोड दरम्यान स्विच करू शकता. व्यू-वन्स मोडमध्ये फाईल ओपन केल्यावर डिलीट केली जाते.
Telegram नवीन डिवाइसमध्ये लॉग इन केल्यावर प्रत्येक वेळी एक अलर्ट पाठवला जाईल. युजर्स डिवाइसच्या सेटिंगमध्ये जाऊन पाहू शकतात की त्यांनी कोणकोणत्या डिवाइसवर लॉग इन केलं आहे. युजर्स टू-स्टेप व्हेरिफिकेशन देखील जोडू शकतात. ह्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी आणि सिक्योरिटी मध्ये जा. त्यानंतर टू-स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करा.