मात्र, ही भरती कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, प्रारंभिक नियुक्ती १ वर्षासाठी असेल. पण गरज पडल्यास चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांचा कार्यकाळही वाढवता येईल. निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या दिल्लीत केल्या जातील. त्यामुळे संपूर्ण अधिसूचना वाचून उमेदवार निवड प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती तपासून त्यांनातर अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथेहे क्लिक करा.
शैक्षणिक पात्रता :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित विषयातील पदवीसह ३ वर्षांचा अनुभव असावा.
ज्या उमेदवारांना कामाचा अनुभव नाही ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आले आहे.
म्हणजे ज्या उमेदवारांचे वय ६५ वर्षे आहे. ते अर्ज करू शकतात.
(वाचा : ONGC Recruitment 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली, आता या तारखेपर्यंत अर्ज करा)
वेतन विषयक :
निवड झालेल्या उमेदवारांना ६० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर भत्तेही दिले जातील.
असा करा अर्ज :
– सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करावे लागेल.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– यानंतर फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– यानंतर फॉर्म फी भरा.
– आता फॉर्म सबमिट करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : Google Internship 2024: गुगलमध्ये इंटर्नशीप करा आणि नोकरी मिळवा; ऑनलाइन अर्ज उपलब्ध)