‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये ४८४ जागांसाठी भरती आजचा करा अर्ज

ECIL Recruitment 2023 Notification: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने ITI ट्रेड अप्रेंटिसच्या नियुक्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. ECIL (Electronics Corporation of India Limited) हैदराबादमध्ये शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत विविध विषयांमधील एकूण ४८४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १० ऑक्टोबर २०२३ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. २५ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ECIL च्या अधिकृत वेबसाइट careers.ecil.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, येथे दिलेली महत्त्वाची माहिती जसे की रिक्त जागा तपशील, शैक्षणिक पात्रता आणि पगार इत्यादी काळजीपूर्वक वाचा. ECIL भरती २०२३ अधिसूचनेची थेट लिंक खाली दिली आहे.

(वाचा : CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात बंपर भरती, एक लाखांहून अधिक मिळणार पगार)

पदभरतीचा तपशील :

  • ईएम (EM) – १९० जागा
  • इलेक्ट्रिशियन – ८० जागा
  • फिटर – ८० जागा
  • आर अँड एसी (R&AC) – २० जागा
  • टर्नर – २० जागा
  • मशिनिस्ट – १५ जागा
  • मशीनिस्ट (G) -१० जागा
  • कोपा – ४० जागा
  • वेल्डर – २५ जागा
  • पेंटर – ४ जागा

शैक्षणिक पात्रता :

संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयटी केलेले सर्व उमेदवार अपरेंटिस भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती तपासू शकतात. वेबसाइटवर तपशील दिलेला आहे.

वयोमार्यादा :

  • उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे असावे. तर कमाल वय २८ वर्षे असावे.
  • तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.
  • उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी विहित तारखेपर्यंत अर्ज करावा आणि फॉर्म अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा.
  • कारण चुकीचा भरलेला फॉर्म कोणत्याही उमेदवारासाठी स्वीकारला जाणार नाही. याशिवाय, अर्जाची अंतिम तारीख देखील कंपनी वाढवणार नाही.

ECIL भरतीसाठी असा करा अर्ज :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– यानंतर लॉग इन करा.
– आता ECIL भर्ती फॉर्म भरा.
– संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
– यानंतर, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : ONGC Recruitment 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली, आता या तारखेपर्यंत अर्ज करा)

Source link

ecilecil recruitmentecil recruitment 2023electronics corporation of india limitediti jobssarkari naukari
Comments (0)
Add Comment