ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात भरती; बारावी ते पदवीधरांना मिळणार रोजगार..

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीबाबत महाराष्ट्र वन विभागाने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यटन व्यवस्थापक, कॉल सेंटर असिस्टंट, मिनीबस चालक, चालक यासह एकूण ०८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर आहे. ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान भरती मधील पदे, पात्रता आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या:
डेटा एंट्री ऑपरेटर – ०२
पर्यटन व्यवस्थापक – ०१
कॉल सेंटर असिस्टंट – ०३
मिनीबस चालक – ०१
चालक – ०१
एकूण पदसंख्या – ०८ जागा

(वाचा: NTRO Recruitment 2023: राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध पदांच्या भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज…)

शैक्षणिक पात्रता:
डेटा एंट्री ऑपरेटर – वाणिज्य शाखेतील पदवी आणि इंग्रजी आणि मराठी संगणक टंकलेखन आवश्यक.
पर्यटन व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी आणि मराठी संगणक टंकलेखन आवश्यक.
कॉल सेंटर असिस्टंट – बारावी परीक्षा उत्तीर्ण, MS-CIT किंवा तत्सम मान्यताप्राप्त संगणक परीक्षा उत्तीर्ण असावी.
मिनीबस चालक – बारावी परीक्षा उत्तीर्ण, अवजड मालाचे मोटार वाहन, अवजड प्रवासी मोटार वाहन यांचा परवाना आवश्यक.
चालक – बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि अवजड मालाचे मोटार वाहन, अवजड प्रवासी मोटार वाहन, हलके मोटार वाहन यांचा परवाना आवश्यक.

नोकरी ठिकाण: ताडोबा, चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन / ई-मेल द्वारे

निवड प्रक्रिया: मुलाखत माध्यमातून.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदीर जवळ, मुल रोड, चंद्रपूर – ४४२४०१.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता: ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ ऑक्टोबर२०२३

राज्य वन विभागाची अधिकृत वेबसाईट: https://mahaforest.gov.in/

या भरतीसंदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी ”या” लिंकवर क्लिक करा.

अर्ज कसा करावा: वरील पदांकरिता ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज अंतिम तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जसोबत पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता करावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

(वाचा: ESIS Pune Recruitment 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांची भरती! वेळ न दवडता लगेच करा अर्ज)

Source link

Career Newsforest job maharashtraforest jobsGovernment jobJob Newsjobs in tadoba tiger reserve projectmahaforest bharati 2023maharashtra forest department recruitmentTadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2023
Comments (0)
Add Comment