मुंबईत शिवसैनिकांची राणेंविरोधात पोस्टरबाजी; निलेश राणेंनी दिलं थेट आव्हान

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Cm Uddhav Thackeray) विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शिवसैनिकांनी मुंबईत पोस्टरबाजी करत नारायण राणेंवर टीका केली होती. यावर नारायण राणे यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसैनिकांना थेट आव्हान दिलं आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात मध्यरात्री दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात एक पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवर कोंबडी चोर असं लिहिलेलं आहे. यावर निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

LIVE नारायण राणेंच्या अडचणी वाढणार; तीन गुन्हे दाखल

निलेश राणेंनी एक ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात. कुठेतरी बॅनर लावा आणि मिडीयावर हात छाटण्याची वार्ता करुन शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यांनी लक्षात घ्यावं आम्हाला काहीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध प्यायलं असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ, असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाड, नाशिक आणि पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, नाशिक पोलिस आयुक्तांनी राणेंना अटक करण्याचे आदेश काढले आहे. त्यासाठी नाशिक पोलिस चिपळूणला रवाना झाले आहेत. त्यामुळं हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

वाचाः मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, राणेंना अटक होणार का?; पोलिसांचे पथक रवाना

वाचाः
‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेचा राणेंवर वार; मुंबईत पोस्टरबाजी

Source link

Narayan Ranenarayan rane arrest ordernarayan rane latest newsnarayan rane statement on cm uddhav thackeraynilesh rane on shivsenaउद्धव ठाकरेनारायण राणे
Comments (0)
Add Comment