४ थी पास असणाऱ्या तरुणांसाठी ही भरती एक आनंदाची बातमी ठरणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२३ आहे.
(वाचा : ECIL Recruitment 2023: ईसीआयएलमध्ये ४८४ पदांसाठी भरतीसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख)
पदभरतीचा तपशील :
संस्था : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, formerly Konkan Krishi Vidyapeeth)
भरले जाणारे पद : अन्न सुरक्षा दलाचे सदस्य
पद संख्या : १० जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ ऑक्टोबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- इयत्ता चौथी पास,
- शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक.
- यंत्र सामुग्री ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकिकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.
(वाचा : ONGC Recruitment 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली, आता या तारखेपर्यंत अर्ज करा)
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३८ वर्षे व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४३ वर्षे राहील.
महत्त्वाचे :
- उमेदवाराने विहित प्रपत्रामध्ये पूर्ण तपशील भरून अर्ज सादर करावा. अर्ज मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या नावे सादर करावा.
- अर्ज पाठवताना Envelope वर अर्ज केला आहे त्या पदाचे नाव, सिंधुरत्न समृद्धि या योजनेअंतर्गत असे लिहिणे अनिवार्य आहे.
- पात्र उमेदवारांची निवड समितीद्वारे मुलाखती आणि प्रत्येक्षिक परिसखा घेऊन करण्यात येईल
- मुलाखतीच्यावेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : RaghNeeti Education: Scholars असणाऱ्या परिणिती-राघवची लग्नगाठ, दोघेही होते हुशार विद्यार्थी जाणून घ्या या दोघांचे शिक्षण)