Nothing लाँच केला नवा ब्रँड CMF; Watch Pro, Buds Pro आणि चार्जर भारतात सादर

Nothing CMF ब्रँडनं आपली पहिली प्रोडक्ट लाइनअप लाँच केली आहे. ज्यात CMF Watch Pro, CMF Buds Pro आणि CMF Power 65 GaN चा समावेश आहे. Nothing चे CEO Carl Pei नी काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती की नथिंगपेक्षा वेगळा एक ब्रँड घेऊन ते येत आहेत, जो कमी किंमतीत IOT प्रोडक्ट सादर करेल. चला पाहूया CMF Watch Pro, CMF Buds Pro आणि CMF Power 65 GaN ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन.

Nothing CMF Watch Pro चे फीचर्स

स्पेसिफिकेशन पाहता CMF Watch Pro मध्ये चौकोनी डायल देण्यात आला आहे. ह्यात अ‍ॅल्युमिनियम एलॉय फ्रेमसह ब्राइट ऑरेंज कलरमध्ये स्ट्रॅप मिळत आहे. स्मार्टवॉचला आयपी६८ रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे हे आउटरडोर आणि इंडोर अ‍ॅक्टिव्हिटी दरम्यान वॉच पाणी आणि धुळीपासून वाचेल.

हे देखील वाचा: कमी किंमतीत ८जीबी रॅम असलेला 5G Phone; ३ ऑक्टोबरला सुरु होईल LAVA Blaze Pro 5G ची विक्री

यात १.९६ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट ५०हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस ६०० निट्झ आहे. वॉचमध्ये Always on Display आणि १०० पेक्षा जास्त वॉच फेस मिळतात. ह्यात ११० सपोर्ट्स मोड्ससह अनेक हेल्थ फीचर्स जसे की हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर मिळत आहेत.

CMF वॉच प्रो स्मार्ट नोटिफिकेशन, वेदर अपडेट, रिमोट कंट्रोल सारख्या अनेक स्मार्ट फिचरला सपोर्ट करतं. कनेक्टिव्हिटीसाठी यात GPS आणि ब्लूटूथ ५.३ देखील मिळतं. नवीन स्मार्टवॉच ३४०एमएएचच्या बॅटरीसह येतं. CMF चा दावा आहे की ऑलवेज-ऑन डिस्प्ले बंद असल्यास डिवाइस १३ दिवस देखील चालू शकतं.

CMF Buds Pro चे स्पेसिफिकेशन

TWS बड्स प्रो स्टेम डिजाइनसह आले आहेत आणि सोबत आयपी५४ रेटिंग देण्यात आली आहे. ह्यात यात ३ एचडी माइक देखील आहेत. हे बड्स प्रो कॅटेगरीमध्ये टॉप ४५ डेसिबल अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सह आले आहेत. चार्जिंग केस मध्ये ४६० एमएएचची बॅटरी मिळते, तर प्रत्येक इअरबडमध्ये ५५एमएएचची बॅटरी आहे. जी एकदा चार्ज केल्यावर ११ तास (नॉन-स्टॉप प्लेबॅक) चालू शकते. सीएमएफ बड्स प्रो फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात आणि फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये हा ३.५ तासांपर्यंत चालू शकतात.

चार्जर मध्ये USB Type-C पोर्ट आणि एक USB-A पोर्ट देण्यात आला आहे. चार्जर मध्ये Qualcomm QuickCharge ४.० चा सपोर्ट आहे.

हे देखील वाचा: १३,९९९ रुपयांमध्ये फीचर्सची उधळण; ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, १६जीबी रॅम आणि बरंच काही…

किती आहे किंमत?

CMF Watch कंपनीनं ४,४९९ रुपयांच्या बेस किंमतीत लाँच केला आहे. CMF Buds Pro ची किंमत ३,४९९ रुपये आणि CMF Power 65 GaN ची किंमत २,९९९ रुपये आहे. हे प्रोडक्ट Flipkart, Myntra आणि Vijay Sales वरून विकत घेता येतील. ह्या अ‍ॅक्सेसरीज फक्त ५०० रुपये देऊन प्री-ऑर्डर करता येतील. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १००० रुपयांपर्यंत सूट आणि स्पेशल लाँच प्राइज मिळेल. तसेच, CMF चे ५०० रुपयांचे व्हाउचर मिळतील.

Source link

cmf buds procmf watch proNothingnothing cmfnothing cmf buds pronothing cmf watch pro
Comments (0)
Add Comment