itel P54 5G ची किंमत
आयटेल पी५५ ५जी फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये ४जीबी रॅमसह ६४जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत ९,६९९ रुपये आहे. तर ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेल ९,९९९ रुपयांमध्ये आला आहे. हा स्वस्त ५जी फोन येत्या ४ ऑक्टोबर पासून अॅमेझॉनवर Blue आणि Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: १३,९९९ रुपयांमध्ये फीचर्सची उधळण; ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, १६जीबी रॅम आणि बरंच काही…
itel P55 5G स्पेसिफिकेशन्स
आयटेल पी५५ ५जी फोन १६१२ x ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.६ इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
हा आयटेल फोन अँड्रॉइड १३ ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी २.४गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मधील मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी ४जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये एक्स्ट्रा ४जीबी वचुर्अल रॅम तसेच ६जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये ६जीबी वचुर्अल रॅम जोडते.
itel P55 5G फोन कंपनीनं १० ५जी बँड्ससह बाजारात आणला आहे. हा मोबाइल फोन ड्युअल मोड ५जी म्हणजे Standalone (SA) आणि Non-Standalone (NSA) ला सपोर्ट करतो. त्यामुळे भारतीय टेलीकॉम ऑपरेटर्सची ५जी सेवा सहज वापरता येईल. त्याचबरोबर Dual-Band Wi-Fi, Bluetooth आणि GPS सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत.
हे देखील वाचा: Nothing लाँच केला नवा ब्रँड CMF; Watch Pro, Buds Pro आणि चार्जर भारतात सादर
फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे सोबत एक एआय लेन्स आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी आयटेल पी५५ ५जी फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.