नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यात वातावरण तापले आहे. शिवसैनिकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर सकाळी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोपांची स्पष्टीकरण दिलं आहे.
नारायण राणे यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसंच, शिवसैनिकांनी राज्यभरात भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. यावरही नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दगडफेक करणं म्हणजे पुरुषार्ध नाही. सरकार जे काय करतायत त्याला करुदेत आम्ही पाहून घेऊ, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत नारायण राणेंनी राज्य सरकारला सुनावलं आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोबाड फोडण्याची भाषा केली होती. हे बोलणं म्हणजे गुन्हा नाही का? मग त्यावेळी गुन्हा का दाखल झाला नाही?, असे सवाल उपस्थित केले आहेत.
मुंबईत शिवसैनिकांची राणेंविरोधात पोस्टरबाजी; निलेश राणेंनी दिलं थेट आव्हान
मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहित नाही हा देशद्रोह आहे, असं सांगतानाच मी असतो तर… ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता, असं स्पष्टीकरण नारायण राणेंनी दिलं आहे.
नाशिक पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशावरही नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे? मी जे बोललो तो गुन्हा नाही..तपासून पाहावं,’ असं यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं.
नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याच्या भाजपला झळा
आमचं पण सरकार वर आहे हे कुठपर्यंत उडी मारतात ते पाहू, असा इशारा नारायण राणेंनी यावेळी दिला आहे. जनआशीर्वाद नियोजित वेळेप्रमाणे होणार. शिवसैनिकांच्या आक्रमकतेला मी जुमानत नाही मी डबल आक्रमक आहे, असं नरायण राणेंनी म्हटलं आहे. नाराणय राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाच ते शिवसैनिक पण गेले, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, राणेंना अटक होणार का?; पोलिसांचे पथक रवाना