कर्ज काढून लाख रुपयांचा iPhone 15 Pro घेण्यापूर्वी ही बातमी वाचा; ग्राहकांना होत आहे पश्चाताप

iPhone 15 Series अलीकडेच विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ह्या सीरीजच्या iPhone 15 Pro मॉडेलबद्दल अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तक्रार केली आहे. अनेक युजर्सनी नवीन आयफोनच्या डिस्प्ले, बॅटरी, स्पिकर्स आणि ओव्हर हीटिंग बद्दल रिपोर्ट केला आहे. तसेच iPhone 15 Pro च्या बिल्ट क्वॉलिटीवर देखील सवाल केले आहेत. अलीकडेच आलेल्या एका ड्रॉप टेस्टमध्ये नवीन आयफोन मॉडेल आधीच्या मॉडेलच्या तुलनेत जास्त ठिसूळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका युजरनं ह्या फोनचा तुटलेल्या डिस्प्लेचा फोटो देखील X वर शेयर केला आहे.

नवीन आयफोन सीरीजच्या टॉप व्हेरिएंट्स- iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max बद्दल सर्वात जास्त तक्रारी आल्या आहेत. ह्या दोन्ही डिवाइसेसची प्रारंभिक किंमत लाखांपेक्षा जास्त आहे. अ‍ॅप्पलनं युजर्सच्या तक्रारींबाबत कोणतंही विधान केलं नाही. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर युजर्सनी ओव्हर हीटिंग, स्क्रॅच, कॅमेरा अलाइनमेंट, बिल्ड क्वॉलिटीबद्दल सर्वात जास्त तक्रार केली आहे.

हे देखील वाचा: OnePlus च्या सर्वात स्वस्त टॅबलेटमध्ये असेल ८०००एमएएचची बॅटरी; प्रोसेसरचा देखील झाला खुलासा

युजर्स त्रस्त

ओव्हरहीटिंगची समस्या

iPhone 15 Pro Series चे फीचर्स

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये टायटेनियम फ्रेम देण्यात आला आहे. हे दोन्ही प्रीमियम डिवाइसेज 3nm A17 Pro Bionic चिपवर चालतात. फोनमध्ये USB Type C वायर्ड आणि फास्ट वायरलेस चार्जिंग फीचर मिळतं. ह्याच्या प्रो मॉडेलमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, तर प्रो मॅक्स मॉडेल ६.७ इंचाच्या डिस्प्लेसह येतो. हे दोन्ही डिवाइसेस iOS 17ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. ह्यात १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळतो.

वाचा: आयफोनला टक्कर देण्यासाठी Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro मैदानात; बॅटरीची काळजी घेण्यासाठी खास सिस्टम

Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हे दोन्ही फोन ४८ मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह येतात. सोबत १२ मेगापिक्सलचे आणखी दोन कॅमेरे मिळतात. ह्याच्या मॅक्स व्हर्जनमध्ये पेरीस्कोप लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Source link

appleapple iphone 15 proiPhoneiPhone 15 proiphone 15 pro overheatingiphone 15 pro overheating problem
Comments (0)
Add Comment