भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…

भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीमध्ये अनेक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया ‘हाय परफॉर्मन्स अनलिस्ट’ म्हणजेच ‘उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक’ या पदाच्या नियुक्तीसाठी राबवण्यात येत आहे. या पदाच्या एकूण ६४ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ५ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वय, वेतन आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या:
उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक – ६४ जागा

विभागवार पदे
फिजिओथेरपिस्ट – १२ जागा
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्स्पर्ट – २८ जागा
फिजिओलोजिस्ट – ८ जागा
सायकोलाजिस्ट – ४ जागा
बायो मॅकॅनिक्स – १० जागा
न्यूट्रिशियनिस्ट – १ जागा
बायोकेमिस्ट – १ जागा
एकूण रिक्त जागा – ६४

(वाचा: ESIS Pune Recruitment 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांची भरती! वेळ न दवडता लगेच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता: संबधित विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबधित विभागातील कामाचा ५ वर्षांचाए अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा: कमाल वयोमार्यादा ४५ वर्षे. एसससी, एसटी, ओबीसी प्रवर्गाला सवलत आहे.

वेतनश्रेणी: मासिक १ लाख ५ हजार आणि वार्षिक १० टक्के पगारवाढ.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ ऑक्टोबर २०२३

या भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट: sportsauthorityofindia.nic.in

या भरतीसंदर्भातील सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी ”या” लिंकवर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा: या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sportsauthorityofindia.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ५ ऑक्टोबर आधी सादर करावे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: NTRO Recruitment 2023: राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध पदांच्या भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज…)

Source link

Career NewsGovernment jobJob Newsjobs in sports fieldSAI Recruitment 2023Sports Authority of IndiaSports Authority of India recruitment 2023sports jobs
Comments (0)
Add Comment